मदरसात बालकावर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पाच दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-मदरसामध्ये अल्पवयीन बालकासोबत लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला नांदेड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.27 नोव्हेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाणे नांदेड येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार मदरसा जामियॉ इस्लामियॉ दारे अरकम हस्सापूर वाघी वळण रस्ता येथे वस्तीगृहात राहणाऱ्या एका 10 वर्षीय बालकासोबत त्याच शाळेत शिक्षक असलेल्या महम्मद शाहनवाज अब्दुल रकीब (26) मुळ रा.बिहार याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आली. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 575/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्याकडे आहे.
वजिराबाद पोलीसांच्या पथकाने काल दि.29 नोव्हेंबर रोजी बालकावर अत्याचार करणारा शिक्षक महम्मद शाहनवाज अब्दुल रकीबला अटक केली आज पोलीस निरिक्षक कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहनवाजला न्यायालयात हजर करून झालेल्या घटनेसंदर्भाने तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी पोलीसांची विनंती मान्य करत महम्मद शहानवाजला पाच दिवस अर्थात 5 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…

मदरसामध्ये 10 वर्षाच्या बालकावर दोन शिक्षकांकडून लैगिंक अत्याचार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!