वीज वितरण कंपनीच्या दोन जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-वीज वितरण कंपनीतील लोकांनी 2 लाखांचे वीज बिल भरावे लागेल अशी भिती दाखवून 20 हजारांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांना नांदेड जिल्हा न्यायालयाने उद्या दि.30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याकडे असलेल्या वीज मिटरवर 2 लाखाचे वीज बिल येईल अशी भिती दाखवून त्याच्याकडून25 हजार रुपये मागितले. त्यानंतर वीज बिल शुन्य करण्यासाठी उर्वरीत 20 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाागाकडे तक्रार केली आणि 28 नोव्हेंबरच्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान महावितरण कार्यालय एमआयडीसी सिडको येथे 20 हजारांची लाच स्विकारल्यानंतर महावितरणचे सहाय्यक लेखापाल सोनाजी मोतीराम श्रीमंगले(42) आणि विद्युत सहाय्यक गजानन कोंडीबा केंद्रे(31) या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 1109/2024 दाखल झाला आणि त्यांना अटक झाली.
आज दुपारी पोलीस निरिक्षक प्रिती जाधव, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, विच्छेवार आणि सचिन गायकवाड आदींनी महाविरणच्या दोन्ही लाच घेणाऱ्या व्यक्तींना न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड.रणजित देशमुख यांनी हा प्रकार पोलीस कोठडी देण्यासाठी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर न्यायाधीशांनी त्या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी….

2 लाखाच्या वीज बिलाची भीती दाखवून 20 हजाराची लाच स्वीकारणारे एमएसईबी चे दोन गजाआड

समाज कल्याण विभागातून जवळपास दीड कोटी रुपयांचे बिल काढून ते पैसे बॅंकेत जमा झाल्याबरोबर त्यातील 40 लाख रुपये लाच म्हणून स्विकारणाऱ्या दोघांना आज न्यायालयाने तुरूंगात पाठवून दिले आहे. 40 लाखांची लाच स्विकारणारे शिवराज विश्र्वनाथ बामणे आणि चंपत वाडेकर यांना न्यायालयाने एकूण 6 दिवस पोलीस कोठडी दिली होती. ती पोलीस कोठडी आज संपली. त्यानंतर न्यायालयाने पोलीसांच्या विनंतीनुसार त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. याबद्दलची अधिक माहिती घेतली असता न्यायालयाने आज तरी त्यांना जामीन मंजुर केला नाही म्हणून त्यांची रवानगी तुरूगांत करण्यात आली असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!