नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील 24 पोलीस अंमलदारांना आश्वासित प्रगती-3 या योजनेद्वारे श्रेणी पोलीस उपनिरिक्षक असे संबोधीत करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आदेश जारी केले असून पदोन्नती झालेल्या सर्व श्रेणी पोलीस उपनिरिक्षकांना शुभकामना दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 24 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरिक्षक असे संबोधन द्यावे यासाठीचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केले आहेत. श्रेणी पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती प्राप्त करणारे पोलीस पुढील प्रमाणे आहेत. त्यांची सध्याची नियुक्ती कंसात लिहिलेली आहे.
बब्रुवान कोंडीबा वाघमारे, नारायण सदाशिव कोठुळे, बापुराव राघोबा जाधव, सदाशिव यशवंतराव उबाळे, शैलेंद्रसिंघ हुजूरासिंघ मान, शिवाजी काशिनाथ येकाळे, गंगाधर रामराव केंद्रे, छाया गंगाराम कांबळे(पोलीस मुख्यालय), दत्तात्रय संभाजी कदम(कुंटूर), प्रल्हाद नागन बाचेवाड(भोकर), बळीराम आनंदराव दासरे, तानाजी मोहन शिंदे, सुर्यभान दिगंबर कागणे(नियंत्रण कक्ष), बाबुराव धोंडीबा भरकाळे(सी-47), बाबाराव दिगंबरराव पवार(गुप्त वार्ता विभाग), शेख शादुल शेख लाल, मधुकर व्यंकटराव शिंदे, परमेश्र्वर जळबाजी कदम (नांदेड ग्रामीण ), शेख शादुल रब्बानीसाब, दिगंबर दत्तात्रय बगाडे (लोहा), मिलिंद विठ्ठलराव कात्रे(हिमायतनगर), माधव नामदेव केंद्रे(स्थानिक गुन्हे शाखा), पद्माकर आदीनाथ गायकवाड, गणेश नरसींगराव नवाटे(शहर वाहतुक शाखा).
पदोन्नती प्राप्त करणाऱ्या सर्व श्रेणी पोलीस उपनिरिक्षकांचे वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने हार्दिक अभिनंदन..