हरीयाणासारखे महाराष्ट्रात होवू नये म्हणून उमेदवारांनी दक्षता घ्यावी

द्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्या अगोदर हरीयाणा विधानसभा निकालासंदर्भाने एका पत्रकाराने शोध पत्रकारीता करुन काढलेली माहिती धक्कादायक आहे. ते पत्रकार हेमंत अत्री आहेत. हरीयाणा विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करतांना त्यांनी केलेल्या अंदाजाच्या विरोधात हरीयाणा विधानसभेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यानंतर त्यांनी आपण केलेले विश्लेषण चुकले त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागितली होती. आता मात्र त्यांनी शोधून काढलेल्या माहितीप्रमाणे त्यांचेच विश्लेषण बरोबर होते हे सिध्द झाले. उद्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्यावेळी प्रत्येक उमेदवाराने विशेष करून विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आम्ही सादर करत असलेल्या विश्लेषणावर लक्ष देण्याची गरज आहे. तरच राजीवकुमारच्या मशीन धोका देणार नाहीत.
हरीयाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेंव्हा जनता, ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सोबतच काही भारतीय जनता पार्टीचे नेते हे सांगत होते की, हरीयाणामध्ये आमची सत्ता येणार नाही. मतदान झाले त्या दिवशी मात्र हरीयाणाचे मुख्यमंत्री साहेबसिंह सैनी यांनी सांगितले होते की, आम्ही ज्याप्रमाणे मध्यप्रदेश आणि उत्तराखंड जिंकले आहे. त्याच प्रमाणे आम्ही हरीयाणा जिंकणार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या सभेत सांगितले होते की, हरीयाणामध्ये जनतेने दिलेल्या ऐतिहासीक विजयासारखा ऐतिहासीक विजय महाराष्ट्राची जनता सुध्दा भाजपला देणार आहे. आज सुरू असलेल्या विविध सर्व्हेक्षणात महायुतीची सरकार येईल असेच दिसते आहे. हरीयाणामध्ये निवडणुकांचे अंदाज व्यक्त करतांना नरेंद्र मोदी यांच्या मिडीयाने सुध्दा ते हरणार आहेत असे सांगितले होते.
हरीयाणातील पत्रकार हेमंत अत्री यांनी काल एक गुप्त माहिती काढली ज्याला शोध पत्रकारीता म्हणतात. त्यांनी काढलेल्या माहितीप्रमाणे हरीयाणाच्या निवडणुक प्रचारात कॉंगे्रसचे दीपक बावरीया हे प्रभारी होते. पण दुर्देवाने पुर्ण निवडणुकीदरम्यान ते आजरीच राहिले. म्हणून त्यांनी कोणताही सक्रीय सहभागी निवडणुकीत घेतला नाही. हेमंत अत्री यांनी काढलेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबर 2024 रोजी हरीयाणा विधानसभेची मतमोजणी झाली. त्या दिवशी दिपक बाावरीया यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने सकाळी 7.30 वाजता अर्थात मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर एक संदेश पाठविला आणि त्यात लिहिलेले आहे की, हरीयाणा विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल असा येणार आहे. ज्या हाय फ्रिक्वंसीने राजीवकुमारचे मशीन जोडलेले आहेत. त्यातील ती माहिती आहे. माहिती देणारा 14 विधानसभाच्या क्रमांकांसह, नावांसह सांगतो आहे की, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसाठी मशीनमध्ये खेळ करण्यात आला आहे. पुढे चार मिनिटांनी तो दुसरा संदेश पाठवितो की, हे आम्ही कसे केले आहे. परत दोन मिनिटांनी तिसरा संदेश पाठवतो की, तुम्हाला पहिले दोन संदेश वाचून हासू आले असेल. पण मी सत्यच सांगतो आहे हे सायंकाळी कळेल. हरीयाणा विधानसभेचा निकाल त्या व्यक्तीने मतमोजणीसाठी मशीन सुरू करण्याआगोदरच दिला होता. दुर्देवाने हा संदेश दिपक बावरीया यांनी दुसऱ्या दिवशी 9 ऑक्टोबर रोजी पाहिला आणि त्वरीत ही सुचना कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. पण त्या नेत्यांनी काल दि.21 नोव्हेंबरपर्यंत काही केले नाही. याचे दु:खही हेमंत अत्री व्यक्त करतात. त्यांच्या मते निवडणुक मतदान मोजणी प्रक्रिया सुरू होण्याअगोदर आलेला हा संदेश आणि त्यावर लिहिलेली निवडूण येणाऱ्या उमेदवारांची संख्या तसेच राजीवकुमारच्या ज्या मशीनमध्ये गडबड झाली ते मतदार संघ त्याने क्रमांक आणि नावांसह लिहिले आहेत असे एकूण 14 मतदार संघ आहेत.
ही घटना समोर येताच न्युज लॉंचरचे अशोक वानखेडे, आशिष चित्रांशी यांनी हेमंत अत्रीसोबत या घटनेची चर्चा केली तेंेव्हा हेमंत अत्री सांगत होते की, मला हा संदेश कोणी पाठवला याचे नावा सुध्दा माहित आहे. पण पत्रकारीतेत स्त्रोताचे नाव सांगता येत नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवाची पर्वा करून मी हे नाव सांगत नाही. पण हेमंत अत्री म्हणतात, 45 दिवस पुर्ण व्हायला आता 48 तास शिल्लक आहेत. तरी कॉंग्रेस नेत्यांनी या संदेशावर कोणतीही कार्यवाही का केली नाही याचे मला सुध्दा आश्चर्य वाटत आहे. कारण कोणत्याही निवडणुकी संदर्भाने याचिका दाखल करायची असेल तर त्यासाठी 45 दिवसांचा वेळ आहे. तो 24 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हेमंत अत्री असेही सांगतात की, कॉंगे्रसने या घटनेवर जलद कार्यवाही केली असती तर झारखंड आणि महाराष्ट्र मशीनची कमाल करण्यापासून वाचले असते. हेमंत अत्री हे एकमेव पत्रकार आहेत. ज्यांनी हरीयाणाच्या निवडणुक निर्णयाचे विश्लेषण करतांना त्यांनी केेेलेल्या विश्लेषणासारखे उमेदवार निवडूण आले नाहीत म्हणून निवडणूक नंतरच्या कार्यक्रमात जनतेची क्षमा मागितली होती.
आपल्या विश्लेषणात हेमंत अत्री हे सुध्दा सांगत होते की, कोट्यावधी रुपये खर्च करून व्हीव्ही पॅड तयार करण्यात आले.प्रत्येक मतदान केंद्रावर ते लावण्यात येतात आणि निवडणुकीच्या एका मतदार संघातील पाच व्हीव्हीपॅडची क्रॉस तपासणी केली जाते. मग कोट्यावधी रुपये खर्चच का केले. पाच ठिकाणी मशीन लावायच्या आणि त्याचंी मोजणी व्हायलाच हवी असा दंडक असायला हवा होता. आशिष चित्रांशी सांगत होते. व्हीव्हीपॅडच्या पाच मशीनची तपासणी सर्वात शेवटी ठेवली जाते. पाच व्हीव्ही पॅडमधील मतदान यांची संख्या आणि विजयी उमेदवाराकडे असलेल्या लीडची संख्या ही खूप मोठा फरक असेल तर व्हीव्ही पॅडची तपासणीच केली जात नाही हा सुध्दा एक घोळ आहे.
हेमंत अत्री यापेक्षा जास्त सांगत होते की, सध्याच्या परिस्थितीत भारताची असलेली अवस्था ही पुढच्या काही काळामध्ये श्रीलंका आणि बांग्लादेशासारखी झाली नाही तरच देवाची कृपा. कारण श्रीलंका आणि बांग्लादेश हे लहान देश आहेत. भारतात तसा उद्रेक झाला तर काय होईल हे सांगताच येणार नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. कमीत कमी नमुना क्रमांक 17 सी ची तपासणी करतांना त्या ठिकाणी असलेली मतदान मशीन, व्हीव्ही पॅड मशीनचे क्रमांक तपासावे. तसेच नमुना 17 सीमध्ये झालेल्या मतदानाची संख्या आणि मोजण्यात आलेल्या मतदानाची संख्या पुर्ण आहे की, नाही हे पाहावे. तसेच जे व्हीव्ही पॅड क्रास तपासणीसाठी ठेवले आहेत. त्याची तपासणी सुध्दा करून घेण्यात यावे. काय माहित उद्या सकाळी नांदेडमधील एखाद्या व्यक्तीला हरीयाणासारखा संदेश आला आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही तर काहीही होईल. कारण हाय फ्रिक्वंसीच्या माध्यमातून राजीवकुमारच्या मशीन जोडलेल्याच आहेत. हरीयाणाच्या प्रकरणाची माहिती ज्या व्यक्तीने दिपक बावरीया यांना दिली. हे सुध्दा महत्वपूर्ण आहे. त्याने ती माहिती हरीयाणा राज्यातील कोण्या कॉंगे्रस पक्षाच्या माणसाला दिली नाही. तर कॉंगे्रसच्या प्रभाऱ्याला दिली. त्याला वाटले असेल, ्रदेवाने त्याच्या डोक्यात टाकले असेल की, तुला सर्व माहित आहे आणि या चुकीच्या बाबी उघड करणे ही तुझी जबाबदारी आहे. म्हणूनच त्याने तो संदेश पाठविला असेल. पण कॉंगे्रस पक्षाने या संदर्भाने कोणतीची माहिती प्रसारीत केली नाही. किंवा सक्षम अधिकाऱ्याकडे या संदर्भाने विरोध दाखल केला नाही हे सुध्दा एक कोडे आहे. परंतू उद्या होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी या विश्लेषणानुसार जास्तीत जास्त दक्षता घ्यावी यासाठीच आम्ही ही मेहनत केली आहे.
बातमीच्या संदर्भासाठी न्युज लॉंचर या युट्युब चॅनलची लिंक जोडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!