नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत जनतेने मुळ निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने सन 2019 च्या निवडणुकीत केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान केले आहे. यंदाची लोकसभा मतदान आकडेवारी 62.89 टक्के आहेत तर विधानसभेच्या 9 मतदार संघामध्ये 64.92 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. ही आकडेवारी अंदाजितच आहे. आता शेवटीची आणि अंतिम आकडेवारी कधी येईल हे निवडणुक निर्णय अधिकारीच ठरवतील. कारण यामध्ये पोस्टल मतदान जोडायचे आहे असे त्यांनी लिहिले आहे. तसेच मतदान केंद्रांवर प्रत्येक राजकीय पक्षाच्या एजंटला नमुना क्रमांक 17 सी दिला असल्याचेही लिहिले आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यंदा 65.2 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 1995 नंतर हा दुसरा उच्च आकडा आहे. 1995 मध्ये 71.7 टक्के मतदारांनी आपला मतदान हक्क बजावून तयार केलेला उच्चांक अद्याप मोडीत निघाला नाही. परंतूू नांदेड जिल्ह्याचा विचार करू तेंव्हा नांदेड जिल्ह्याच्या 9 विधानसभा मतदार संघात मिळून जनतेने 66.88 टक्के मतदान केले होते. यंदाचे मतदान 64.92 आहे. त्यात 85-भोकर 71.01, 90-देगलूर 59.75, 84-हदगाव 70.40, 83-किनवट 70.05, 88-लोहा 67.61, 91-मुखेड 59.78, 89-नायगाव 69.50, 86-नांदेड उत्तर 56.65, 87-नांदेड दक्षीण 58.02 असे एकूण मतदान 64.92 टक्के झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाचे मतदान 1.96 टक्यांनी कमी आहे.
एप्रिल 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 16-नांदेड लोकसभेच्या मतदार संघात जनतेने 60.94 टक्के मतदान केले होते. यंदाच्या लोकसभा पनोट निवडणुकीत जनतेने 62.89 टक्के मतदान केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्व्या तुलनेत जनतेने पोट निवडणुकीमध्ये 1.95 टक्के जास्त मतदान केले आहे. ज्यामध्ये 85-भोकर मतदान 75.01, 86-नांदेड उत्तर मतदान 56.65, 87-नांदेड दक्षीण मतदान 58.02, 89 नायगाव 69.50, 90-देगलूर मतदान 59.75, 91-मुखेड मतदान 59.78 असे आहे.
निवडणुक आयोगाच्यावतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जारी केलेल्या माहितीमध्ये ही आकडेवारी अंदाजित असल्याचे म्हटले आहे. यात पोस्टल मतदान जोडायचे आहे असे नमुद केले आहे. सोबतच मतदानानंतर भरला जाणारा नमुना क्रमांक 17 सी प्रत्येक मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांच्या एजंट सोबत दिला असल्याचेही लिहिले आहे.