स्टेटस नावाचं खूळ आणि इगो नावाची भ्रांत नसलेले पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार..!

पल्या पोलीस जीवनातील विधानसभा निवडणुक अपर पोलीस अधिक्षक या पदावरून पहिल्यांदा आपण पाहिली. त्यावेळी पोलीस अधिक्षक हे दुसरे होते. आता याच जिल्ह्यात पोलीस अधिक्षक झाला आहात आणि आपल्यासमोर विधानसभा निवडणुक सुध्दा आहे. ही निवडणुक सुध्दा आपल्या पोलीस जीवनातील पहिलीच निवडणुक आहे. नांदेड जिल्ह्यातील विचार केला तर लोकसभा पोट निवडणुक आणि जिल्ह्यातील 9 विधानसभा निवडणुका असा दुहेरी फंडा आपल्या समोर आले. यातच आपला जन्मदिवस विधानसभा व लोकसभा पोट निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या दिवशी आहे. पुढील 48 तास आपल्याला भरपुर काम आहे. आपल्या या मेहनतीला परमेश्र्वरांने यश द्यावे आणि आपण केलेल्या कामाची दखल राज्यस्तरावर व्हावी अशी आमची परमेश्र्वराकडे प्रार्थना आहे.
18  नोव्हेंबर हा नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा जन्मदिन आहे. अबिनाश कुमार नांदेडमध्ये अपर पोलीस अधीक्षक या पदावर 11 नोव्हेंबर 2022 रोजी रूजू झाले. त्यानंतर त्यांचा जन्मदिन 2023 मध्ये साजरा झाला. त्यानंतर त्यांच्या अपर पोलीस अधीक्षक पदाचे 32 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या पदांवर जन्मदिवस येणारे अबिनाश कुमार हे पहिलेच अधिकारी आहेत. पोलीस अधीक्षक झाल्यावर आपल्या मनात स्टेटस नावाचं खूळ आणि इगो नावाची भ्रांत निघून गेल्यावर उरेल ती मानवता. अधिकारी म्हणून बघणाऱ्यांचा दृष्टीकोन आणि वागणाऱ्यांचे दृष्टीकोन या पलीकडे असते ते सामान्यांतले असामान्य आपल्याला सामान्य जीवनातला जगण्याचा अनुभव आम्हाला लेखन करून सांगता येणार नाही. त्यासाठी अनुभव आणि अनुभूती घ्यावी लागते. पोलीस अधीक्षक पदाच्या कालखंडात आपल्याला अत्यंत मोठी मेहनत करावी लागणार आहे. त्यासाठी अबिनाश कुमार यांच्या जन्मदिनावर या शब्दरूपी शुभकामना सादर करत आहोत.
पोलीस विभागात भारतीय पोलीस सेवेद्वारे प्रवेश मिळविण्याअगोदर अबिनाश कुमार यांनी काही खाजगी कंपन्यांमध्ये काम केले, लोकसेवा आयोगाद्वारे होणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून आयकर विभागात पद मिळविले, परंतु त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रगतीची आशा सोडली नव्हती, आणि पुढे ते पुन्हा लोकसेवा माध्यमातून भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले आणि परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर, नंतर अपर पोलीस अधीक्षक नांदेड या पदावर आणि आता पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. अपर पोलीस अधीक्षक असताना आपल्याला फक्त 18 पोलीस ठाण्यांचा कारभार सांभाळायचा होता, आता 36 पोलीस ठाण्यांचा सांभाळायचा आहे. त्यातही प्रशासकीय काम वाढले आहे, प्रत्येक पोलीस अधिकारी आणि प्रत्येक पोलीस अंमलदारांच्या अडीअडचणी सोबत नांदेड जिल्ह्याच्या 24 लाख जनतेच्या जीवनाचे आणि संपत्तीचे रक्षण सुद्धा आपल्या जबाबदारीत आले आहेत. ही जबाबदारी पार पाडताना आपल्या समक्ष येणाऱ्या अडचणींचा वाटा पार करताना असे सादर करायचे आहे की, कोणतीही वाट ज्या प्रमाणे तयार झाली आहे, त्याप्रमाणेच आपल्याला त्यावर चालावे लागते. वाटांवरील वळणे कधी सरळ होत नाही. आपल्यालाच वळण घेऊन त्या वाटांवर पुढे जावे लागते. हे करत असताना आपल्याला या गोष्टीचेपण लक्ष ठेवायचे आहे की, आपल्या त्या मार्गक्रमणामध्ये आपल्या सोबत कोण आहे. आपल्याअबिनाश कुमार सोबत येणारा व्यक्ती पद आणि व्यक्तीमत्व या दोन गोष्टींमुळे आपल्यासोबत येणार आहे. पदामुळे येतो तो अनेक कारणांनी येतो. पण व्यक्तीमत्वामुळे जो येतो, तो खऱ्या अर्थाने आपलासोबती येतो. त्यांना आपल्याला ओळखायचे आहे. नसता असे होईल की, आपल्याला जो आरसा दाखवला जातो, त्याप्रमाणेच प्रतिबिंब आपल्याला दिसेल, पण ते प्रतिबिंब खरे असेल याची काहीही खात्री नाही. त्यामुळे आरशात दिसणारे प्रतिबिंब हे मला पाहायचे आहे आणि त्यातील सत्य शोधायचे आहे, हा आभास आपल्याला प्रत्येक पावलांवर आवश्यक आहे.
दिवसभर काम करून माणुस एवढा थकत नाही, जेवढा क्रोध आणि चिंतेने एका क्षणात थकतो. त्यामुळे आपल्याला यावर नियंत्रण मिळवायचे आहे. हे नियंत्रण अवघड असते, परंतु त्याला पर्याय नाही. म्हणून पर्याय नसताना आहे त्या अवस्थेतच आपल्याला आपल्यासमोर असणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचे आहे. पोलीस दलात दिसणारी एक महत्वाची परिस्थिती अशी असते की, पोलीस अधीक्षक माझेच आहेत, असा खोटा भास दाखविण्यासाठी काही मंडळी नेहमीच कार्यरत असतात. त्या मंडळींना चपराक सुद्धा आपल्यालाच द्यायची आहे. काही मंडळी मी व्हिसल ब्लोअर आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण ते समाजाचे व्हिसल ब्लोअर नसून समाजाचे रक्त पिणारी मंडळी आहेत, हे आपल्याला शोधायचे आहे आणि त्यांच्या नांगी कापून टाकायचे आहेत. कारण त्यामुळे समाजाला आनंद मिळणार आहे. आनंद हा चंदनासारखा असतो. तुम्ही दुसऱ्यांच्या कपाळावर चंदन लावतात, तर तुमची बोटे पण सुंगधाने बहरून उठतील. तो सुगंध पसरविण्यासाठी आपल्याकडे बरेच अधिकार आहेत, बरीच मोठी शक्ती आणि शक्तीचा सदुपयोग करून समाजाच्या आनंदासाठी नक्कीच आपण केले पाहिजे. आनंदाचे बोलत असताना असेही सांगायची इच्छा आहे की, दरवेळी गंभीर राहून सुद्धा जमणार नाही. आपल्याला शिकले पाहिजे की, छोट्या-छोट्या गोष्टींवर हास्य कसे येईल. आणि आपल्या चेहऱ्यावर हसू येईल तेव्हा जीवन साधे आणि सरळ आहे, याचा अनुभव सुद्धा तयार होईल. तुम्हाला आपल्या मान-सन्मानांवर गर्व करणयाचा अधिकार आहे, पण त्यावर घमंड करता येणार नाही. कारण बहुतेकवेळा मान-सन्मान हा व्यक्तींचा नाही तर आवश्यकतेचा होतो आणि आवश्यकता समाप्त झाली की, सर्व काही समाप्त होत असते. परंतु आपल्या येणाऱ्या दोन वर्षांच्या कालखंडात समाप्त हा शब्द यायलाच नको, ही अपेक्षा आहे.
आपल्याकडे सर्वात मोठा प्रश्न पोलीस कल्याणाचा आहे. त्यात काही मंडळी पोलीस कल्याणाच्या नावावर गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. तो त्यांना मिळतोही. कधी-कधी गरजवंताला मात्र कोणताच पोलीस कल्याणाचा फायदा मिळत नाही आणि ते त्याबद्दल ओरड करत असतात. आपल्या कालखंडात ओरड होणार नाही, याची जबाबदारी आपण उचललीच पाहिजे आणि खऱ्या गरजवंतांना पोलीस कल्याणातील मदत त्वरीत मिळाली पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न हवेत. आपले अधिकारी आपल्याला केलेले काम कसे दाखवतात हे पाहताना त्यातील सत्य तपासण्याची गरज आहे. याचा अर्थ असा नक्कीच नव्हे की, सर्वच तसे करतात. परंतु जे करतात त्यांना त्यांची योग्य जागा दाखविणे, ही जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. विहीत वेळेप्रमाणे 730 दिवस आपल्याला काम करायचे आहे आणि या 730 दिवसांमध्ये कोणाचेही बोट आपल्याकडे इंगीत होणार नाही, याची दक्षता घेणे सर्वात प्रथम होत आहे. असे म्हणतात जीवनात आनंद कधी मिळेल, परंतु त्या जीवनात ज्यांना सर्व काही मिळाले, ते सुद्धा नाराजच असतात. म्हणून आपल्याला जीवनातला आनंद शोधण्यापेक्षा मी कोणासाठी काय करू शकतो, यावर जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. तरच 730 दिवसांचा कालखंड सुखासुखी पूर्ण होईल. आपला पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक म्हणून हा पहिलाच जिल्हा आहे. याबद्दल असे म्हणतात अनुभवाची उत्पती होत नाही, त्यासाठी वेळ देवून तो प्राप्त करावा लागतो. हा अनुभव प्राप्त झाल्यावर आपल्याला पुढच्या जिल्ह्यांमध्ये नक्कीच त्याचा उपयोग होईल.
पोलीस विभागात काम करताना आजच्या परिस्थितीमध्ये नागरिकांशी सलोख्याचे संबंध हा भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला नेहमीच नदीत पोहण्यासारखे काम करावे लागेल. कारण येणारी समस्या ही आपल्याला त्या परिस्थितीशी लढायला शिकवते. ज्या माणसाला सतत शुभ्र आणि आशावादी विचार करण्याची सवय असते, त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाचे माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते. आपण उत्साही आहातच पण त्यात कधीच कमतरता येणार नाही, हे लक्षात असुद्या. आपल्या जीवनात जमेल तेव्हा प्रेमाने देण्याची सवय लावून घ्या. आयुष्यभर लोक आपल्याला विसरणार नाहीत, असे आमचे मत आहे. अंदाज ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव ही जीवनाची शिकवण. कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे आपली इच्छा ठरवत नाही, तर परिस्थिती ठरवते. समाधान असेल तर पैसा सुख देतो, नाहीतर कितीही मिळविला तर तो कमीच होतो. म्हणून समाधानाचा शोध करा. काम करताना आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याची घाई करण्यापेक्षा स्वत:च्या मनाला विचारा की, मी केलेले चूक आहे की, बरोबर. आपले मन जे उत्तर देईल, तेच आपल्यावर होणाऱ्या आरोपांचा प्रतिक्रिया असावी. आपण आता मजबूत आहात आणि विचारवंत लोक म्हणतात, मजबूत लोक क्षमा करतात. क्षमेमध्ये सर्वात मोठे देणे आहे. इतरांसोबत चर्चा, वाद-विवाद करण्यापेक्षा स्वत:ला प्रश्न विचारा इतरांना विचारले तर नवीन प्रश्न तयार होतात. त्यामुळे स्वत:लाच प्रश्न विचारा आणि त्यातच उत्तरे शोधा. प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तर लपलेलच असते. आपल्यावर कोणी कटाक्ष केला तर त्यावर चिडण्याऐवजी सर्वप्रथम एक स्मिथ हास्य करा आणि त्यानंतर त्याचे उत्तर द्या. कोणालाही विष देऊन सहज मारता येते, पण त्याला शरबत पाजून त्याच्या मनात असलेली खदखद दूर करा, हा आपल्या आलोचनेवरील सर्वोकृष्ट उत्तर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!