राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

नांदेड :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय शालेय 14 वर्षांतील मुले- मुली बेसबॉल क्रीडा स्पर्धा पीपल्स महाविद्यालय मैदान, नांदेड येथे 6 जानेवारी ते 8 नोव्हेंबर, 2024 दरम्यान पार पडणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सचिव नांदेड एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती शामल पत्की, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते आज झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाअध्यक्ष सी.ए.डॉ प्रवीण पाटील यांनी भूषविले. यावेळी प्रमुख उपस्थिती पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.एम.जाधव, प्रमुख पाहुणे एस एम पटेल, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जे.ई.गुपिले,  सुरज सोनकांबळे, नृसिंह आठवले, महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघटनेचे तांत्रिक समितीचे गोकुळ तांदळे, कोल्हापूरचे सचिव राजेंद्र बनसोडे, ज्ञानेश काळे, क्रीडाअधिकारी संजय बेतीवार, क्रीडा मार्गदर्शक प्रकाश होनवडजकर, बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, हौशी बेसबॉल जिल्हा संघटना नांदेडचे सचिव आनंदा कांबळे, निवड समिती सदस्य प्रदीप पाटील, वैष्णवी कासार, छ.संभाजीनगरचे सचिव तथा पंच प्रमुख गणेश बेटूदे, पीपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक विलास वडजे हे उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी केले. आज झालेल्या सामन्यासाठी संतोष आवचार, आकाश साबणे, सोमनाथ सपकाळ, विशाल कदम, बालाजी गाडेकर, राहुल खुडे, गौस शेख यांनी पंच म्हणून तर गुणलेखक म्हणून सायमा बागवान, अमृता शेळके इत्यादींनी भूमिका निभावली.

स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडा कार्यालयातील संतोष कणकावार वरिष्ठ लिपिक, दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळे, यश कांबळे, शेखअक्रम,चंदू गव्हाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा संघटना आदी परिश्रम घेत आहेत.

आज झालेल्या सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

मुले विभाग – 1) कोल्हापूर वि. वी छ. संभाजीनगर (15-0) होम रन, 2) लातूर वि. वीनागपूर (7-1) होम रन, 3) पुणे वि. वी मुंबई (10-4) होमरन4) अमरावती वि. वीनाशिक (17-1) होमरन तर मुली विभाग – 1) मुंबई वि. वी नाशिक (7-5) होमरन, 2) अमरावती वि. वी लातूर (16-3) होमरन, 3) नागपूर वि. वी छ. संभाजीनगर (13-5) होमरन, 4) पुणे वि. वी कोल्हापूर (15-0) होमरनया स्पर्धा पिपल्स कॉलेज, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून, यास्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा प्रेमी, रसीकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!