*लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल*
• *मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल*
नांदेड- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत.
*नांदेड लोकसभा पोटनिवडणूक*
16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत.
*नऊ विधानसभा क्षेत्रापैकी*
किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले.
84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले.
85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले.
86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छुकांनी आज 65 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 81 इच्छुकांनी 97 अर्ज दाखल केले.
87-नांदेड दक्षिणमध्ये 38 इच्छुकांनी आज 50 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 56 इच्छुकांनी 73 अर्ज दाखल केले.
88-लोहामध्ये 19 इच्छुकांनी आज 31 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 54 अर्ज दाखल केले.
89-नायगावमध्ये 18 इच्छुकांनी आज 27 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 48 अर्ज दाखल केले.
90-देगलूरमध्ये 28 इच्छुकांनी आज 39 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 43 इच्छुकांनी 60 अर्ज दाखल केले.
तर 91-मुखेडमध्ये 13 इच्छुकांनी आज 19 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 24 इच्छुकांनी 35 अर्ज दाखल केले.
नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभेसाठी एकूण 288 इच्छुकांनी आज 388 अर्ज दाखल केले तर आतापर्यंत एकूण 515 इच्छुकांनी 667 अर्ज दाखल केले आहेत.