नांदेड (प्रतिनिधी)-कंधार बस स्थानकावर एका व्यक्तीच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या तिन जणांना पकडण्यात आले आहे . लखन सोमनाथ कहाळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता ते बस स्थानक कंधार येथे गर्दीमध्ये बसमध्ये प्रवेश करीत असतांना त्यांच्या आणि साक्षीदारांच्या खिशातील 5500 रुपये चोरून घेऊन जातांना पांडूरंग तुकाराम जाधव (28) रा.सोनवती लातूर, सुनिल प्रभाकर जाधव(45) रा.कौठा ता.उमरगा आणि गणेश व्यंकटराव जाधव (32) रा.सलगरा जि.लातूर या तिघांना पकडले. यांच्यासोबत तीन लोक अजून होते. लोहा पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 347/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस अंमलदार व्यवहारे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 838 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोहा आणि माळेगाव येथे दोन दुकाने फोली; अडीच लाखांचा ऐवज लंपास अर्धापूरच्या डॉ.इकबाल उर्दु हायस्कुलमध्ये 16 लाखांची फसवणूक