रस्त्यावर उभी कार पेटली

नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगरजवळच्या शारदानगर पाटी जवळ सायंकाळी एका कारला आग लागली. अग्निशमन दलाने या कारची आग विझवली.
आज सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास कार क्रमांक एम.एच.26 ए.के.4198 ही गाडी शारदानगर पाटी जवळ उभी असतांना अचानक तिला आगीने घेरले. आग भडकली तेंव्हा लोकांनी अग्नीशमन दलाला बोलावले. त्यानंतर अग्नीशमन दलाने कारची आग आटोक्यात आणली. मात्र जिवीत हाणी झाली नाही ह सुदैव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!