नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप व्यसनमुक्त गाव योजना राबवित असतांना अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोण गावच्या महिलांनी दारु बंदी मोर्चा काढला. बोलतांना या महिलांना रडू येत होते. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी स्वत: महिलांचे निवेदन न घेता पोलीस उपनिरिक्षकाला पोलीस स्टेशन बाहेर पाठवून त्यांचे निवेदन स्विकारले.
एकीकडे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप व्यवसनमुक्त गाव मोहिम राबवत आहेत. अर्धापूर शहरापासून 10 किलो मिटरवर असलेल्या लोण गावातील महिलांनी दारु बंदी मोर्चा काढला. अर्धापूर शहरातून हा मोर्चा चालत पोलीस ठाणे अर्धापूरपर्यंत गेला. लोण हे गाव लहान बीट या हद्दीत आहे.
या महिलांनी दिलेल्या निवेदनाद्वारे अवैध धंदे जसे दारु, मटका, पत्ते बंद करण्याबाबत लोण (बु) येथील नागरीकांचे निवेदन आहे. त्यांच्या निवेदनानुसार पिदाडे आपले कुटूंबियांवर अन्याय करतात, त्यामुळे हिंसाचार घडतो, अल्पवयीन बालके दारु पियायला लागले आहेत. पोलीसांनी या बाबत दखल घेवून महिलांना हिंसाचारापासून मुक्त करावे.
महिलांचा मोर्चा पोलीस ठाणे अर्धापूर येथे गेला असतांना महिलांचे सांत्वन करण्यासाठी सुध्दा पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम पोलीस ठाण्याच्या बाहेर आले नाही तर काही पोलीस अंमलदार आणि एका पोलीस उपनिरिक्षकांना पाठवून महिलांकडून निवेदन स्विकारण्यात आले. या निवेदनावर सौ.गंगासागर उत्तम कडू, सौ.पंचफुला नागोराव धुळगंडे, सौ.गोदावरीबाई शिवाजी हाके, सौ.संगीता माधव हेमनर, अन्नपुर्णा बालाजी शेंडगे, पिराबाई किशन धुळगंडे, उज्वला अवधुत धुळगंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. भारताच्या 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुध्दा या निवेदनावर तिन महिलांनी आपले अंगठे लावले आहेत.
बहुदा या महिलांना माहित नसेल की, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी व्यसनमुक्त गाव ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत त्या-त्या गावाच्या पोलीस ठाण्यांचा महत्वाचा सहभाग आहे. महिलांनी हे निवेदन शहाजी उमाप यांना दिले असते तर जास्त उत्कृष्ट कार्यवाही झाली असते असे म्हटले तर चुक ठरणार नाही.
व्हिडीओ 2
व्हिडीओ 3