नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा रुग्णालयाची श्रेणी वाढवून देत शासनाने आता 300 खाटांऐवजी जिल्हा रुग्णालयात 500 खाटांची सोय करण्याचे आदेश दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवर सचिव कविता पिसे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
नांदेड जिल्हा रुग्णालयात आजपर्यंत 300 खाटांची सोय होती. पण नांदेड जिल्हा रुग्णालयात असलेल्या विविध सुविधांमुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे शासनाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता की, 300 खाटांऐवजी 500 खाटांची श्रेणीवृध्दी करून द्यावी. त्यानुसार शासनाने हा निर्णय मान्य करून जाहीर केला आहे. शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक 202410072004490317 नुसार प्रसिध्द केला आहे.