गुरुद्वारा बोर्ड सरकारच्या ताब्यातून मुक्त करा-राजेंद्रसिंघ शाहु यांचे देवेंद्र फडणवीसांना खुले पत्र

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचखंड गुरुद्वारा सरकारी ताब्यातून मुक्त करण्याची जाहीर विनंती नांदेड येथील सरदार राजेंद्रसिंघ नौनिहालसिंघ शाहु यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या आपल्या विनंतीला सरदार राजेंद्रसिंघ शाहु यांनी प्रसिध्दीसाठी वास्तव न्युज लाईव्हकडे सुध्दा पाठविले आहे. त्यात ते म्हणतात. गेल्या 25 वर्षापासून सातत्याने गुरुद्वारा बोर्डावर प्रशासक सरकारच्यावतीने नेमला जातो आणि त्यामुळे अल्पसंख्याक सिख समाजाला भारतीय संविधानातील लोकशाही मार्गाने लोकनियुक्त अध्यक्ष व सदस्य निवडण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे अशा प्रकारे अन्याय करता करता शिखर गाठले जात आहे. सन 2015 मध्ये आपण जेंव्हा मुख्यमंत्री होतात तेंव्हा एका चाणाक्ष राजकारण करणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असल्याचे मत असणाऱ्या व्यक्तीमार्फत गुरुद्वारा कायद्यात सुधारणा करत कलम 11 लादले. त्यामुळे सरकारी चेअरमन पाठवून सचखंड गुरुद्वाऱ्यावर सरकारचा ताबाच झाला. येथेही न थांबता सरकारी चेअरमनच्या मार्फत गुरुद्वारा बोर्डाच्या आर्थिक बाबी आणि जमीनी बळकावून आपल्या मर्जितील लोकांना, कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू झाले.
सरकार राजेंद्रसिंघ शाहु देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतात की, आपण एक चांगले काम करणारे व्यक्तीमत्व आहात. त्यात सन 2008 मध्ये गुरु-ता-गद्दी विकास कामांच्या नावावर बोर्डावर लादण्यात आलेले 61 कोटी रुपयांच्या कर्जातून आपण मुक्त केले. जगभरातील सिख समाजाचा आणि सोबत धार्मिक पंजप्यारे साहिबान यांचा विरोध असतांनाही गुरुद्वारा बोर्ड कायदा बदलण्याची स्थिती आज दिसत आहे. मी माझ्यावतीनेच नव्हे तर सर्व सिख समाजाच्यावतीने आपणस कळकळीची विनंती करतो की, गुरुद्वारा बोर्डातील कलम 11 मध्ये केलेली सुधारणा रद्द करून नवीन कायदा आणण्याचा हट्ट सोडावा. अल्पसंख्याक सिख समाजाला स्वत:ची संस्था व धार्मिक, ऐतिहासीक गुरुद्वारा प्रबंधन चालविण्यासाठी मोकळे करावे. ऐतिहासीक गुरुद्वाऱ्यातील पाठपुजा , मर्यादा संपुर्ण जगभरातील गुरुद्वाऱ्यापासून वेगळी आहे. यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रभाव आहे.
साहेब मी राजकारणापासून अल्पीत राहणारा माणुस आहे. फक्त आणि फक्त न्यायाची व आमच्या हक्काची लढाई असल्याने आणि श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या शिकवणीनुसार अन्यायाविरुध्द लढण्याची तयारी ठेवणारा सिख व्यक्ती आहे. एवढे लिखान करण्याचा खटाटोप केला आहे. आपल्या व आपल्या पक्षाच्याबाबतीत माझ्या मनात कोणताही दुराग्रह नाही. तरीपण माझ्या लिखानामुळे आपणास काही वाईट वाटले असेल तर मला क्षमा करावी.
-राजेंद्रसिंघ नौनिहालसिंघ शाहु
सामाजिक कार्यकर्ता व इलेक्ट्रीकल प्रशिक्षक
अबचलनगर नांदेड
मो. नंबर 7700063999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!