नांदेड :- राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड येथून ज्येष्ठ नागरिकांना घेवून पहिली ट्रेन 12 ऑक्टोबर 2024 रोजी निघणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली आहे. तरी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 4,182 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी ;विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नांदेडला नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी