शिराढोण येथील भिमाशंकर नवरात्र व यात्रा महोत्साला सुरूवात

नांदेड(प्रतिनिधी)-शिराढोण येथील भिमाशंकर मठसंस्थान येथे दरवर्षी नवरात्र महोत्सव व भिमाशंकर महाराज यात्रा भरत असते. याच प्रमाणे 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र महोत्सवानिमित्त विविध दैनंदिन धार्मिक कार्यक्रम पार पडतात.
शिराढोण येथील भिमशंकर यात्रा महोत्सवाची सुरूवात दि.3 ऑक्टोबर रोज गुरुवारी सुरूवात झाली. ही यात्रा श्री.श्री.श्री. 1008 केदार वैराग्यपिठाधीश्वर जगद्‌गुरु भिमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सानिध्यात हा नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये दैनंदिन शिवपाठ, दुर्गा पारायण, रेणुका विजय पुराण, अखंड सप्ताह रात्री 8 ते 11 किर्तन,भजन आणि महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम दि.3 ऑक्टोबर ते 11ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होतो. 11 ऑक्टोबर रोजी दशमी या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 महाप्रसाद, रात्री 8 वाजता अग्नीकुंडाची विधीवत पुजा करुन अग्नी पेटवली जाते, रात्री 10 ते 1 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि धर्मसभा, रात्री 3 वाजता श्री.भिमाशंकर महाराज यांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश करते. दि.12 ऑक्टोबर रोजी शनिवारी विजयादशमीच्या दिवशी सकाळी 11 वाजता भिमाशंकर महाराज यांची पालखी मुख्य मठामध्ये गेल्यानंतर श्री. जगद्‌गुरू यांचे आर्शिवचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर या नवरात्र आणि यात्रा महोत्सवाची सांगता होते.
या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या कालावधीत दर्शनासाठी येत असतात. तसेच यात्रेसाठी पंचक्रोषितूनही मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी या ठिकाणी येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!