नांदेड(प्रतिनिधी)-एका गुन्ह्याच्या तपासात बनावट कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी एका उद्योजक महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही म् हणून महिलेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात महिलेचया तक्रारीला दाद दिली असून 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश नांदेड ग्रामीण पोलीसांना दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी फसवणूक करणे, खोटे कागदपत्र तयार करणे, कागदपत्र खोटे असल्याचे माहित असतांना ते खरे असल्याचा बनाव करणे आणि यासाठी कट करणे अशा सदरांखाली गुन्हा नोंद केला आहे.
कमल कुंदन पत्रावळी यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडी बळीरामपूर येथे औद्योगिक भुखंड क्रमांक ए-6/3/3 च्या त्या ताबेदार आणि मालक आहेत. या भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ 15686 चौरस मिटर आहे. या जागेवर रमेश विश्र्वंभर पारसेवार यांचा वाईट डोळा होता.18 जानेवारी 2023 रोजी रमेश पारसेवार आणि त्यांच्या साथीदारांनी या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 34/2023 दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या प्रकरणातील आरोपींनी काही कागदपत्र तपासीक अंमलदाराकडे सादर केले. कमल पत्रावळे यांनी या बद्दल माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली की, 10 एप्रिल 2018 रोजी तयार केलेली सौदाचिठ्ठी, तसेच 20 जून 2018 आणि 24 सप्टेंबर 2018 रोजी तयार केलेले संम्मती पत्र/ करार नामा खोटे व बनावट आहे. कमल पत्रावळी यांना आर्थिक नुकसान व्हावे म्हणून हे कागदपत्र तयार करण्यात आले आहे. हे सर्व कागदपत्र हस्ताक्षर तज्ञाकडे पाठविल्यानंतर अहवाल आला की, हस्ताक्षर हे खोटे व बनावट आहे. इतर कागदपत्रांवरील हस्ताक्षराशी ते जुळत नाहीत.
त्यानंतर कमल पत्रावळी यांनी 18 एप्रिल 2023 रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे या बाबत तक्रार दिली. पुन्हा 24 एप्रिल 2023 रोजी पोलीस अधिक्षक नांदेड यांना तक्रार दिली. त्यांच्या या अर्जावर कुठलीच दखल घेण्यात आली नाही. म्हणून कमल पत्रावळी यांनी ऍड.सय्यद अरीबोद्दीन यांच्या मार्फतीने न् या यालयात दाद मागितली. न्यायालयात ऍड.सय्यद अरीबोद्दीन यांनी केलेल्या सादरीकरणानंतर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता 156(3) प्रमाणे रमेश विश्र्वंभर पारसेवार रा.विसावा नगर, भाग्यश्री सत्यनारायण नळगे रा.जंगमवाडी, विजयलक्ष्मी उर्फ अनुराधा संग्राम राणे, संग्राम हरीश्चंद्र राणे दोघे रा.जिल्हा परिषद कॉलनी शहाजीनगर तरोडा, रामजतन बहादुर मंडल रा.उस्माननगर रोड सिडको, कृष्णा राजेंद्र शुक्ला रा.नवा मोंढा नांदेड, मारोती गणपतराव नळगे रा.मराठागल्ली लोहा, सय्यद जमील अशा 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी आठ जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471, 120(ब) नुसार गुन्हा क्रमांक 877/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.