शांततेच्या आंदोलनाला गालबोट
नांदेड(प्रतिनिधी)-आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने नांदेड बंदचे आवाहन केले होते. पण मोर चौकात भाग्यनगर पोलीसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जचे व्हिडीओ डिलिट करण्याचे गुत्ते मुंबईच्या मामाने(पत्रकार)घेतले. परंतू सकल मराठा समाजातील लोकांची मागणी आहे की, पत्रकारांनी तरी आमच्यावर झालेल्या लाठी हल्याचा जाब विचारावा.
आज सकल मराठा समाजाच्यावतीने नांदेड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बऱ्याच एस.टी.बसेस एस.टी.महामंडळाने बाहेरगावी जाऊ दिल्या नाहीत. एखादी एस.टी. गेली होती तिला पण त्रास झाला म्हणून नांदेडहून देगलूरला निघालेली बस चंदांसिंघ कॉर्नरपासून परत बोलावण्यात आली. शहरात सर्वत्र बंद होते.
सकाळी 11 वाजेच्यासुमारास सकल मराठा समजाचे काही कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौक येथून आपल्या दुचाकी गाड्यांवर बंदचे आवाहन करत निघाले असतांना मोर चौकात काही दुकाने सुरू होती आणि काही बंद झाली होती. याप्रसंगी मराठा समाजाचे कार्यकर्ते बंदचे आवाहन करत असतांना भाग्यनगर पोलीस तेथे पोहचले. तेथेच पोहचताच पोलीसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे बऱ्याच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मार लागला आहे. यावर बोलतांना मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले की, पोलीसांनी आमच्यावर केलेल्या दादागिरीबद्दल पत्रकारांनी तरी आवाज उठवावा. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानंी सांगितले की, पोलीसांच्या लाठीचार्ज मुळे मोर चौकात चपलांचा ढिग पडला. आमच्या काही दुचाकी गाड्यापण तेथे पडल्या आहेत. त्या गाड्यांच्या चाब्या भाग्यनगर पोलीसांनी घेवून टाकल्या आहेत. आमच्याविरुध्द कोणत्याही नागरीकाची तक्रार नसतांना आमच्यावर झालेल्या लाठीचार्ज झारशाहीसारखा अन्याय आहे असे मराठा समाजाचे कार्यकर्ते सांगत होते.
एवढी घाई सुरू असतांना मुंबईच्या एका मामाने (पत्रकार) पत्रकारांकडे असलेल्या सर्व व्हिडीओ क्लिप डिलिट करून घेण्याचे गुत्ते घेतले. त्यातही एक दुसऱ्याविरुध्द चर्चा करत पत्रकार तेथून बाजूला झाले. पाहायचा हा विषय आहे की, कोण ही बातमी लावता आणि कोण ही बातमी लावत नाहीत.
पत्रकारीते विषयी असे सांगतात की, पत्रकारांनी जे सत्ताधिशांना छापून यावे असे वाटत नाही तेच छापने खरी पत्रकारीता आहे. बाकी सर्व रिलेशनशिप सांभाळणे आहे. रिलेशनशिप सांभाळण्यास पत्रकार जास्त महत्व देत असतात आणि आजही तसेच झाले अशी चर्चा होती. अशोक वानखेडे, अशोक पांडे, दिपक शर्मा, मयुर जानी, प्रा.अखिल स्वामी या पत्रकारांचे विश्लेषण पाहायला हवे. तर सत्ताधिशांविरुध्द ते किती बोलतात हे लक्षात येईल.