महिलेला लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे एका महिलेला पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या वस्तुची धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी 1 लाख 30 हजार 700 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे.
भक्तापुर रोड देगलूर येथे राहणाऱ्या विजयालक्ष्मी शैलेंद्र येनरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 सप्टेंबरच्या सायंकाळी 7 वाजता त्या आपल्या घराकडे जात असतांना 25-30 वयोगटातील 3 जणांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला पिस्तुलसारखी दिसणारी वस्तु व चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. या भितीमुळे महिलेने आपल्या गळ्यातील, कानातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम ज्याची किंमत 1 लाख 30 हजार 700 रुपये आहे. त्या दरोडेखोरांना देवून टाकला. देगलूर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) प्रमाणे गुन्हा क्रमांक 452/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक फड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!