नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
यंदाची दिवाळी विना बंदोबस्ताची साजरी करा-अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षीची दिवाळी आपल्याला विनाबंदोबस्त साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि…
विष्णुपूरी जलाशयाचे दोन दरवाजे उघडले
नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरील लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे व…
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा
मुंबई:-ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी)…