नागरिकांना निकालांच्या प्रतींचे मान.तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते वितरण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर मंडळांतर्गत आज महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानास माननीय तहसीलदार  संजय वारकड  यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तहसीलदार साहेबांच्या हस्ते संबंधित नागरिकांना प्रकरणांच्या निकालांच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. एक सप्टेंबर पासून नांदेड शहर महसूल मंडळामध्ये 123 अर्धन्यायिक प्रकरणांचा. निपटारा करण्यात आला. हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2017 या कालावधीत चालणार आहे. महसूलविषयक प्रकरणांमध्ये नागरिकांना वेळेत न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित कामांचा निपटारा व्हावा, या दृष्टीने या अभियानाला महत्त्व प्राप्त झाले.

सदर अभियान यशस्वी करण्यासाठी नांदेड शहर मंडळाचे मंडळ अधिकारी  अनिरुद्ध जोंधळे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती सविता बते, माधव भिसे,  शिवाजी तोतरे व मोहन कदम, तसेच महसूल सेवक  अविनाश ढोले , अविनाश हिवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच महसूल मित्र  सारिपुत धेंडे व  अनिकेत बोळे यांनीही अभियानाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांची महसूलविषयक कामे सुलभ व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी अशा अभियानांचा महत्त्वपूर्ण उपयोग होत असून, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!