नांदेड (प्रतिनिधी) – यदुकुल यादव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. चौधरी श्यामलाल बिशनलाल यादव यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त यादव अहीर मंडळ, साथी बालाराम यादव नगर, वजीराबाद यांच्या वतीने तसेच मनपा(अरब गल्ली) दवाखान्याच्या विशेष सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. गोकुल बिशनलाल यादव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात एकूण ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर ७० नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. याशिवाय १७ आयुष्मान कार्ड आणि ५४ आभा (ABHA) कार्ड जागेवरच काढून देण्यात आले. शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आयुष्मान व आभा कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी श्री भारत भूषण यादव, सुभाष भोजालाल राऊत्रे, चंद्रभान बटावाले, तुळजाराम बटावाले डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव, ईश्वर गणेश लाल बटावाले, विनयकुमार यादव, मोहनळाला मंडले, दिनेश मुदिराज, अजय बटावाले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्व. श्यामलाल यादव यांच्या समाजसेवी कार्याला उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अरब गल्ली मनपा दवाखान्याचे डॉक्टर गजानन मुनगीलवार, आरोग्य निरीक्षक सुरेश आरगुलवार, आरोग्य कर्मचारी दिनानाथ बगाटे, औषधी निर्माता अधिकारी गोपालदास वैष्णव, लॅब टेक्निशियन अमोल कावळे, प्रमोद कुमार जोंधळे तसेच ए.एन.एम. रंजना वानोळे, दिपाली जोंधळे, भाग्यश्री तारू, सारिका आढाव, प्रवलीका पंचलिंगे, क्रांती कांबळे, श्रीप्रभा दवणे, रूपाली जोंधळे, सुजाता गरजे आणि शिवानी जोंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्व. श्यामलाल यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या समाजोपयोगी आरोग्य शिबिरातून समाजसेवेची परंपरा पुढे नेत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्ञान की छोटी पाठशाला