xr:d:DAFH5TepKpQ:2205,j:45907350737,t:23042604

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील इतवारा परिसरातील फतेहबुरुज येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवलेला १ लाख ३ हजार ७७४ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अहमद भाई, राहणार फतेहबुरुज, इतवारा, नांदेड याच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायंकाळी कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजून १० मिनिटांनी फतेहबुरुज परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी अहमद भाई याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आले.

भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंद याप्रकरणी पोलीस अंमलदार बंडू केशवराव कलंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

इतवारा पोलिसांची धडक मोहीम जारी इतवारा पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीविरोधात कारवाई सुरू ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वीच इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीआयजी पथकाने ४३ लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा पकडला होता. त्या कारवाईनंतर लगेचच इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने फतेहबुरुज परिसरात ही नवीन कारवाई केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!