नांदेड (विशेष प्रतिनिधी) – वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल करोडो रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नागोराव गायकवाड (वय ३८, रा. शिवरायनगर, नांदेड) याला न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जी. चव्हाण यांनी आरोपीला १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन कामकाज व युक्तिवाद पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपी राहुल गायकवाड यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्येंजने व त्यांचे सहकारी आणि सरकारी वकील यांनी न्यायालयात मांडलेला सडेतोड युक्तिवाद व पोलीस कोठडीची तातडीची गरज ग्राह्य धरून न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी व ३५ लाखांची फसवणूक वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. २२६/२०२६ (भारतीय न्याय संहिता सन २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३(५)) नुसार फिर्यादी देवेंद्र शांतीलाल शर्मा (वय ३९, रा. गायत्री नगर, नांदेड) यांनी तक्रार नोंदवली आहे. व्यवहाराचे स्वरूप: मौजे मेंढला खुर्द (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील गट क्र. ७३ मधील ० हेक्टर २१ आर जमिनीचा १ कोटी २६ लाख रुपयांचा व्यवहार ठरवून फिर्यादीकडून ३५ लाख रुपये (बयाना व रोख स्वरूपात) उकळण्यात आले. बनावट दस्तावेज: जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून इतर लोकांनाही हीच जमीन विकल्याचे समोर आल्याने फिर्यादीची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. अटक: याप्रकरणी १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २०:५६ वाजता आरोपी राहुल नागोराव गायकवाड यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.राहुल गायकवाडला स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी अटक केलीआहे . करोडो रुपयांची फसवणूक व पोलीस कोठडीची प्रमुख कारणे रक्कम जप्ती व फरार आरोपींचा शोध: फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करणे तसेच प्रकरणात फरार असलेले इतर दोन आरोपी विशाल गोविंदराव गायकवाड आणि माणिक उर्फ बाबू सरोदे यांचा शोध घेणे बाकी आहे. २ कोटी १० लाखांची इतर फसवणूक: आरोपीने चाकरलोड गंगारेड्डी, गजानन पंदीलवार, सतीश शर्मा, आजम सत्तार शेख आणि राजकुमार कुंटे या ५ पीडित व्यक्तींची सुमारे २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अनेक सोदाचिट्ठ्या व कोर्टातील दावे: आरोपींनी एकाच जमिनीच्या अनेक बनावट सोदाचिट्ठ्या बनवून आणखी १६ लोकांची फसवणूक केल्याचा संशय असून, १२ जणांनी यापूर्वीच न्यायालयात दावे दाखल केले आहेत. सखोल तपास: आरोपीचे हस्ताक्षर नमुने घेणे, गुन्ह्यात सामील असलेले प्रॉपर्टी ब्रोकर व संघटित टोळी निष्पन्न करणे आणि सखोल तपास करणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपीला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अंमलदार : गजानन कदम,एकनाथ क्षीरसागर,सचिन गायकवाड आणि खंदारे यांनी आरोपी राहुल गायकवाडला न्यायालयात हजर केले. आरोपीचे वकील : राहुल गायकवाड च्या वतीने ऍड. ए.बी. शाहरुख आणि त्यांचे सहकारी ऍड. एम.ए.अजीम यांनी पोलीस कोठडी न देण्यासाठी युक्तिवाद केला. Kanthak Suryatal Post Views: 18 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिल्लीत जलसा, यूपीत संकट! आंतरराष्ट्रीय चमक ओसरताच मोदींच्या अडचणी वाढल्या?