नांदेड (प्रतिनिधी) -शहरातील शिवाजीनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काब्दे हॉस्पिटल परिसरातील घर फोडले शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काब्दे हॉस्पिटलमागे नांदेड येथे ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या कुलूपाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत सुनिता सुभाष वाल्मीकी, रा.काब्दे हॉस्पिटलमागे, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आकोसकर करीत आहेत. वसरनी रोडवरील दुकान फोडले दुसरी घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. वसरनी रोडवरील शिंदे ट्रेडर्स या दुकानाचे शटर टर्मिनवरून उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेपासून ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. चोरट्याने दुकानातील २३ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी दिपक गोपाळ शिंदे, रा. मायश्रयी सोसायटी, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गुट्टे करीत आहेत. सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता नांदेड शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Kanthak Suryatal Post Views: 752 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोह्यात बारचे कुलूप तोडून देशी-विदेशी दारू व रोख रक्कम लंपास; १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरी चार लाखांचे कॉईल ऑईल चोरीला; विमानतळ परिसरात दोन लाख २९ हजारांची रोकड हिसकावली