नांदेड (प्रतिनिधी)- हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ ऑगस्ट रोजी आर्चरी स्कूल, श्री गुरु गोबिंदसिंगजी स्टेडियम, नांदेड येथे धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशनचे सचिव तथा राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शिका वृषाली पाटील जोगदंड, माधव सावकार बेळीकर व संतोष चुनोड यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत विविध वयोगट व प्रकारांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लयलूट केली. १० वर्षांखालील इंडियन राउंड मुलांच्या गटात पूरक भाटिया यांनी सुवर्णपदक, पूल प्रकाशसिंग यांनी रौप्यपदक, तर सात्विक टोम्पे व विनीत राऊत यांनी कांस्यपदक पटकावले. मुलींच्या गटात आर्वी सावंत यांनी सुवर्णपदक, अधिरा राठोड यांनी रौप्यपदक, तर शिवन्या दुर्गे यांनी कांस्यपदक मिळविले. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात आधारित रायचूरकर यांनी सुवर्णपदक, श्लोक लांडगे यांनी रौप्यपदक, तर सुखराज सिंग व आरव बंडे यांनी कांस्यपदक पटकावले. सानवी दुर्गे यांनीही सुवर्णपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. रिकर्व्ह राउंडमध्ये आरव कस्तुरे यांनी सुवर्णपदक, तर शौर्य वाघमारे यांनी रौप्यपदक मिळविले. ज्युनिअर राउंडमध्ये अमित वायफनकर व स्वराज कांबळे यांनी सुवर्णपदक, तर अजिंक्य फाजगे यांनी रौप्यपदक पटकावले. ज्युनिअर इंडियन राउंडमध्ये हरप्रीत सिंग यांनी सुवर्णपदक, सिद्धांत सावंत यांनी रौप्यपदक, तर श्रेयश कन्नलवार यांनी कांस्यपदक मिळविले. सीनियर मुलींच्या गटात मीनाक्षी चव्हाण व श्वेता रणबावळे यांनी सुवर्णपदक पटकावत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या खेळाडूंना डॉ. हंसराज वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडे, सचिव वृषाली पाटील जोगदंड, सुरेखा सावंत व संतोष चुनोडे यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे संचालक म्हणून संतोष चुनोडे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रविकांत चव्हाण, अजिंक्य फाजगे व स्वराज कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित धनुर्विद्या स्पर्धेला मोठे यश मिळाले. Kanthak Suryatal Post Views: 659 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चंदा की धंदा? भारतातल्या कागदी राजकीय पक्षांची छुपी अर्थव्यवस्था मराठा आरक्षणासाठी नांदेड कडकडीत बंद
Hello, In the article published on September 4, 2026 about the archery competition on National Sports Day my name is incorrectly spelled as ‘Shreyash Kannalwar.’ My correct name is: Shreyas Kannalwarश्रेयस कन्नलवार Please make the correction. Thank you, Shreyas Kannalwar, Nanded Reply