रोख रक्कम, सहा मोबाईल, मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा ₹२ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त भोकर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत भोकर पोलिसांनी मौजे मोघाळी, ता. भोकर येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध ‘अंदर-बाहर’ जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹२ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मौजे मोघाळी येथील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीररीत्या अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून पंचांसमक्ष कारवाई केली. या कारवाईत नरिसिंग अनंदा राचेवाड (वय ४०), दत्ताहरी संभाजी शिंदे (वय २७), साहेबराव किशन पंतुलवाड (वय ३७), भास्कर ब्रह्मदेव उपरवट (वय ४०), पिराजी लक्ष्मण धोतरे (वय ४२), हर्षवर्धन उत्तम देवके (वय ३७), मोहन गंगाधर वाघमारे (वय ५०), आनंदा हणमंतराव सोळंके (वय ४६), बालाजी उत्तमराव पवार (वय ४६), चांदुनागोराव शिंदे आणि नागोराव शिंदे (वय ६५) यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून सहा मोबाईल फोन, रोख ₹१२ हजार ७०० रुपये, बदक छाप पत्ते तसेच एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹२ लाख १५ हजार २०० रुपये असल्याचे पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६१/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अंमलदार कंधारे, घुन्नर, जिंकवाड, आरेवाड, एकुलवार तसेच रुजकर यांचा सहभाग होता. तसेच विश्वंभर पल्लेवाड यांच्या नियुक्तीचा उल्लेख पोलीस प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर हालचालींविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अशा अवैध प्रकारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 769 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १९८ महिला कर्जदारांकडून वसूल केलेले २२.३५ लाख हडपल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नांदेडमध्ये टॅक्सी बुकिंगच्या नावाखाली तरुणाची १ लाख ६५ हजारांची ऑनलाइन फसवणूक