कंधार (प्रतिनिधी) :- नंदनशिवणी तालुक्यातील कंधार येथील हनुमान मंदिर आणि विठ्ठल-रुक्माई मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी करून ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीवरील सोन्याचे दागिने तसेच दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मूर्तीवरील सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी ईश्वर गणपती देवकते यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 530 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घरच्या सुरक्षित भिंतीही असुरक्षित! टीव्ही पाहणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षांची सक्तमजुरी; नांदेड न्यायालयाचा विदारक वास्तवावर चपराक देणारा निकाल धर्माबादमध्ये बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्धाची सोन्याची चैन लंपास