नांदेड (प्रतिनिधी) – सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर सुरू असल्याचे खोटे आश्वासन देत एका व्यक्तीकडून तब्बल १९ लाख रुपये आरटीजीएसद्वारे खात्यावर जमा करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड शहरातील यशोविहार कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते २ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत यशोविहार कॉलनी, वाडी बु., नांदेड येथे हा प्रकार घडला. यातील आरोपी मनीष ईश्वरदास अग्रवाल, रा. यशोविहार कॉलनी, वाडी बु., नांदेड याने फिर्यादीला सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर सुरू असल्याचे सांगितले. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीकडून १९ लाख रुपये आरटीजीएसद्वारे खात्यावर जमा करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हेमंत मधुकर जाधव (वय ४१, रा. यशोविहार कॉलनी, वाडी बु., नांदेड) यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४५९/२०२६ नोंदविला आहे.आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केजगीर करीत असून, तपासासाठी संपर्क क्रमांक ८८३०७६३२११ देण्यात आला आहे. दरम्यान, १९ लाखांच्या या आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांकडून आरोपीकडून घेतलेल्या रकमेचा व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि फसवणुकीमागील नेमका प्रकार याचा तपास केला जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 848 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रेमप्रकरणाच्या रागातून खून; मुखेड पोलिसांची पाच तासांत तिघांना अटक नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या तीन घटना; दीड लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास