अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमराबाद तांडा येथे डुकराच्या शिकारीच्या मटणाच्या वादातून झालेल्या हत्येच्या खटल्यात नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ तुषार आगलावे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाकडून मुख्य आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि ५०,००० रुपये दंड, तर इतर तीन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिकारीच्या मटणावरून झाला होता वाद २८ फेब्रुवारी २०२२ रोजी आमराबाद तांडा येथे डुकराच्या शिकारीच्या मटणाच्या वादातून आरोपी रणजीत अंगूर पवार व त्याच्या इतर साथीदारांनी बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी बालाजी हारलाल पवार यांचा मुलगा श्रीनिवास याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन श्रीनिवासचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास आणि भक्कम पुरावे या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस अधिकारी कपील आगलावे यांनी केला. त्यांनी घटनास्थळ पंचनामा, जप्ती आणि इतर आवश्यक सखोल तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात हा खटला सेशन केस क्रमांक १२३/२०२२ अंतर्गत चालवला गेला. रणजीत अंगूर पवारला ७ वर्ष सक्तमजुरी जाणीव ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अंगूर बाटु पवार,मीनाबाई अंगूरीर पवार आणि वंदनाबाई अंगूर पवार या तिघांना एक वर्षाची कैद ठोठावण्यात आली. ट्रायल मॉनिटरिंग सेलचे प्रभावी काम नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर गुन्ह्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी ट्रायल मॉनिटरिंग सेल कार्यरत होते. सरकारी पक्षाने सादर केलेला प्रभावी युक्तिवाद आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची न्यायालयात दिलेली विश्वासार्ह साक्ष यामुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपींना कोणतीही सहानुभूती न दाखवता ही कठोर शिक्षा ठोठावली आहे. Kanthak Suryatal Post Views: 852 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवघ्या २० किमीमध्ये दुसरा उड्डाणपूल हादरला; महामार्गाच्या गुणवत्तेवर संताप धर्माबादमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा; ७ जणांना अटक, १.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त