जळकोट (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या आदेशानुसार, लातूर जिल्ह्यातील जळकोट परिसरात एका अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतात सुरू होता जुगार अड्डा मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन संभाजी वाघमारे यांच्या शेत शिवारातील एका टीन शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने तिथे छापा टाकला. या कारवाईत एकूण ९ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया जळकोट पोलीस ठाण्यात सुरू आहे. ४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त या छाप्यात पोलिसांनी ५८,३६० रुपये रोख, ७ मोबाईल संच आणि ८ मोटार सायकली असा एकूण ४,६४,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पथकाने केली कारवाई ही धडाकेबाज कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदिप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे आणि गजानन डवरे यांचा समावेश होता. या पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. शहाजी उमाप यांनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे खबर हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक असलेली खबर हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 701 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणारी टोळी जेरबंद लातूर स्थानिक गुन्हा शाखेने घरफोडीचे १५ गुन्हे उघडकीस आणले