नांदेड – संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वप्नरंग नाट्य महोत्सवाला उद्या, रविवार (दि. २ ऑगस्ट) पासून डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे प्रारंभ होत आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी ७.०० वाजता मुंबईच्या माणूस फाऊंडेशन प्रस्तुत अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस हे गाजलेले मराठी नाटक सादर होणार असून, या नाटकाद्वारे महोत्सवाची रंगतदार सुरुवात होणार आहे. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर असून, आशयघन विषय, प्रभावी दिग्दर्शन आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे या नाटकाने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. नांदेडमधील नाट्यरसिकांनाही हा दर्जेदार प्रयोग पाहण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होत आहे. दि. २ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या त्रिदिवसीय महोत्सवात मुंबई, पुणे, परभणी, लातूर आणि नांदेड येथील नामांकित नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. मराठी नाटक, दीर्घांक, एकांकिका आणि एकल नाट्यप्रयोग अशा विविध प्रकारच्या सादरीकरणांमुळे हा महोत्सव मराठी रंगभूमीचा वैविध्यपूर्ण आविष्कार ठरणार आहे. नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमामुळे परस्पर संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा मिळणार आहे. अशा महोत्सवांमुळे नाट्य चळवळीला बळ मिळण्याबरोबरच सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा आणि गती मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी होणाऱ्या अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस या नाटकाचा रसास्वाद घेण्यासाठी नांदेडकर नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच पुढील तीनही दिवस विविध दर्जेदार नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडचे अध्यक्ष दिनेश कवडे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 575 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निनाद फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम सिक्ख धर्म में किस्मत (भाग्य) और लक (Luck) का क्या महत्व है?