नांदेड (प्रतिनिधी)-निनाद फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बारूळ ग्रामपंचायतीतील (तालुका कंधार, जिल्हा नांदेड) चाळीस शेतकरी आणि शेतमजूरांना सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गमबुटांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्पदंश जनजागृतीपर व्याख्यानासाठी सर्पमित्र व विज्ञानशिक्षक हेमंत धानोरकर परगावाहून आले होते. त्यांच्या सुंदर आणि बोधपर व्याख्यानाचा गावकर्यांना लाभ झाला. नांदेडमधील नाना पालकर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. वह्यांचा खर्च फाउंडेशनचे मित्र शैलेश थोंटे यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे सुप्रसिद्ध त्वचारोग डॉ.अर्जुन मापारे होते. कार्यक्रमास फाउंडेशनचे आशिष कनकुडते, पाटोदेकर, चंद्रशेखर बासवाडेकर, धोंडीराज देशमुख, सचिन टेकाळे, फाउंडेशनचे मित्र अमित देशमुख, सागर व्यवहारे व शाळेचा अध्यापकवृंद उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशिष कनकुडते व सागर व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 442 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमित शाहंचा राजीनामा म्हणजे मोदी सरकारचा अंत? – यशवंत सिन्हांचा खळबळजनक दावा! उद्या अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस या नाटकाचे होणार सादरीकरण