नांदेड (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 तसेच सुधारणा अधिनियम, 2015 यांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नागरिकांच्या शंका-समाधानासाठी गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जिल्हा सरकारी अभियोक्ता, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभणार आहे. ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध तरतुदी, प्रभावी अंमलबजावणी आणि संबंधित शंका-समाधान यावर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती कार्यशाळेला उपस्थित राहून कायद्याची माहिती घेण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरी हक्क संरक्षण विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 389 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बौद्धिक दिव्यांग तरुणीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी; नांदेड सत्र न्यायालयाचा निकाल झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट अंतर्गत नांदेड येथे एकदिवसीय प्रशिक्षण