एका रात्रीत अमेरिकेचे नशीब पालटले! गुप्त डेटा सेंटर उद्ध्वस्त, तेलवाहू जहाजांचा कोळसा!   

मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका? आज संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. एका बाजूला भारतात अंतर्गत घडामोडी सुरू असताना, दुसरीकडे मध्यपूर्वेत इराणने अमेरिकेविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने भीषण रूप धारण केले आहे. गेल्या काही तासांत इराणने अमेरिकेकडून ज्या पद्धतीने वेचून वेचून बदला घेण्यास सुरुवात केली आहे, त्याने वॉशिंग्टनपासून ते लंडनपर्यंत सर्वांची झोप उडवली आहे. इराणने केवळ हल्लेच केले नाहीत, तर अमेरिकेची लष्करी ताकद आणि त्यांच्या तंत्रज्ञानाचा फुगा फोडून काढला आहे.

सर्वात महागड्या MQ-9 ड्रोनचा अंत या संघर्षातील सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि महागडे MQ-9 रीपर ड्रोन इराणने पाडले आहे . सुमारे ७० दशलक्ष डॉलर्स (साधारण ५८० कोटी रुपये) किमतीचे हे ड्रोन बुशहर बंदरगाहाच्या वर उडत असताना इराणच्या नवीन ॲडव्हान्स्ड एअर डिफेन्स सिस्टमने अचूक टप्प्यात घेऊन नष्ट केले. अनेक देशांच्या फायटर जेट्सपेक्षाही महागडे असलेले हे ड्रोन हवेतच नष्ट झाल्यामुळे अमेरिकेच्या हवाई देखरेख यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी: मृत्यूचा नवा मार्ग इराणने स्ट्रेफ ऑफ होर्मुज  मध्ये आपली पकड इतकी घट्ट केली आहे की, आता तिथून कोणतीही हालचाल करणे अमेरिकेसाठी अशक्य झाले आहे. इराणने या भागात मोठ्या प्रमाणावर समुद्री सुरुंग पेरले आहेत. अमेरिकेच्या चिथावणीमुळे आणि सुरक्षेच्या खोट्या आश्वासनामुळे ज्या तेलवाहू जहाजांनी हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यांना भीषण परिणामांना सामोरे जावे लागले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, दोन मोठे तेल टँकर या समुद्री सुरुंगांना धडकल्यामुळे आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत डी-मायनिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमच्या परवानगीशिवाय या मार्गावरून जाणे म्हणजे स्वतःचा मृत्यू ओढवून घेण्यासारखे आहे.

अमेरिकन खुफिया डेटा सेंटर आणि एअरबेसवर हल्ले इराणच्या हल्ल्याची व्याप्ती केवळ समुद्रापुरती मर्यादित नाही. बहरीनमधील अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे आणि गुप्त इंटेलिजन्स डेटा सेंटर इराणने पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. हे डेटा सेंटर अमेरिकेच्या संपूर्ण प्रादेशिक गुप्तचर माहितीचे केंद्र होते, जे आता इतिहास जमा झाले आहे.

याव्यतिरिक्त, इराणने ऑपरेशन नासर-२ च्या १८ व्या लाटेत कुवेत आणि बहरीनमधील लष्करी तळांना लक्ष्य केले:

  • बहरीनचा शेख ईसा एअरबेस: येथे अमेरिकन लढाऊ विमानांचे हँगर, इंधन टाक्या आणि संपर्क पूल मिसाईल्सच्या साह्याने उडवून देण्यात आले आहेत.
  • कुवेतचा अल अहमदी पोर्ट: अमेरिकन नौदलाच्या इंधन पुरवठा केंद्रावर भीषण हल्ला करण्यात आला.
  • आरिफजान ग्राउंड फोर्सेस सपोर्ट सेंटर (कुवेत): येथे अमेरिकन सैनिकांच्या जमावावर हल्ला झाला असून, त्यात अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.

सौदी अरेबियातील एअरबेसवरही निशाणा इराणने आपला मोर्चा आता सौदी अरेबियातील प्रिन्स सुल्तान एअरबेस कडेही वळवला आहे. ज्या तळाचा वापर अमेरिकन विमाने इराणवर हल्ला करण्यासाठी इंधन भरण्यासाठी करत होती, त्या तळावर इराणने मिसाईल डागले आहेत. इराणचा हा हल्ला अत्यंत अचूक असून त्यांनी अमेरिकेच्या रसद पुरवठा साखळीवरच घाला घातला आहे.

अमेरिकन तंत्रज्ञानाचा फोलपणा या युद्धाने अमेरिकेच्या तथाकथित अजेय तंत्रज्ञानाची पोलखोल केली आहे. अमेरिकेची अत्यंत गाजलेली पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टम इराणच्या मिसाईल्सना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. इराणचे हल्ले इतके अचूक आहेत की ते थेट विमानांच्या हँगरमध्ये किंवा रडार सिस्टीमच्या मध्यभागी जाऊन आदळत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, इराणला यासाठी चीनच्या सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि आधुनिक उपकरणांची मदत मिळत असण्याची शक्यता आहे. अमेरिकेची जीपीएस  यंत्रणा इराण वापरत नाही, त्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. दुसरीकडे, अमेरिकेच्या मिसाईल्सचा साठा वेगाने संपत चालला असून तो आता केवळ २० टक्क्यांवर उरला आहे, तर इराणचा साठा अजूनही ७५ टक्क्यांहून अधिक शिल्लक आहे.

जगावर ओढवणारे आर्थिक संकट जर इराणने यमनच्या हुती बंडखोरांच्या मदतीने बाब अल-मंदेब ही सामुद्रधुनी देखील बंद केली, तर जागतिक व्यापार पूर्णपणे ठप्प होईल. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि सौदी अरेबिया तसेच यूएई सारख्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. इराणने स्पष्ट केले आहे की, हे केवळ प्रतिकार आहे; जर अमेरिकेने हल्ले थांबवले नाहीत, तर इराण पूर्ण लष्करी मोहीम सुरू करेल.

इशारा मित्रराष्ट्रांना! IRGC ने कुवेत, बहरीन, जॉर्डन आणि कतार यांसारख्या देशांना इशारा दिला आहे की, जर तुमच्या भूमीचा वापर अमेरिकेने आमच्यावर हल्ले करण्यासाठी केला, तर तुमच्या नागरी सुविधा  देखील सुरक्षित राहणार नाहीत. यामुळे या देशांमध्ये आता दहशतीचे वातावरण आहे.

निष्कर्ष: इराणने अमेरिकेच्या अहंकाराला मोठा तडा दिला आहे. ज्या अमेरिकन शस्त्रास्त्रांवर जग विश्वास ठेवून होते, ती आज इराणच्या समोर जोकर ठरत आहेत. जर येत्या दोन-तीन दिवसांत अमेरिकेने टेबलवर बसून चर्चा केली नाही, तर पुढचा सोमवार जगासाठी ब्लॅक मंडे ठरू शकतो, जिथे केवळ लष्करी तळच नाही तर शहरांच्या शहरांचा संपर्क तुटलेला पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!