नांदेड (प्रतिनिधी) – लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत पत्नीच्या डोक्यात गोळ्या झाडून तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही घटना १३ जून रोजी मध्यरात्री घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल जाधव याने पत्नी अर्चना जाधव हिच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या अर्चना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर विशाल जाधव फरार झाला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याच्या कारणातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, प्रत्येक गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या अधिकारानुसार नांदेड स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेत अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास लोहा पोलीस करत आहेत. संबंधित बातमी …. लोहा शहरात थरार: कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार; आरोपी पती फरार Kanthak Suryatal Post Views: 1,211 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बनावट पोलिसांकडून दीड लाखांच्या सोन्याच्या अंगठ्यांची फसवणूक नांदेडमध्ये मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त; ३९ लाखांचा माल पकडला, आरोपीला पोलीस कोठडी