नांदेड- महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड भागात ८ जून रोजी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी विविध ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील जवळा दे. येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भूकंप जाणवल्यास काय करावे, याबाबत रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, सुषमा गोडबोले, चाँद शेख, भीमराव गोडबोले, मनिषा गच्चे, शिवाजी कापसे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातही भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. अचानक भूकंपलहरी जाणवल्यास काय करावे याबाबत जवळ्याच्या जि. प. शाळेत शिक्षकांकडून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भूकंपा’बाबत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. भूकंप आल्यास शांत राहा आणि खाली बसा, डोके झाका आणि धरून ठेवा या नियमाचे पालन करा. जर तुम्ही घरात असाल तर तिथेच थांबा, बाहेर पळू नका. जड टेबल किंवा बेडखाली आश्रय घ्या. तुम्ही मोकळ्यात असल्यास इमारती व विजेच्या तारांपासून दूर सुरक्षित जागेत उभे राहा. जर तुम्ही घरात असाल तर खाली जमिनीवर बसा, जेणेकरून हादऱ्यांमुळे तुम्ही पडणार नाही. कोणत्याही मजबूत टेबल किंवा खाटेखाली जा आणि आपले डोके व मान हातांनी अथवा उशीने झाका. भूकंप पूर्ण थांबेपर्यंत फर्निचरला घट्ट पकडून ठेवा जेणेकरून ते तुमच्यापासून दूर सरकणार नाही. खिडक्या, काचा, पंखे किंवा जड कपाटांपासून दूर राहा जेणेकरून ते तुमच्या अंगावर पडणार नाहीत. घराबाहेर असल्यास काय करावे? घराबाहेर असल्यास घाबरून न जाता लगेच मोकळ्या जागेत जा. इमारती, झाडे, विजेचे खांब आणि तारांपासून दूर राहा. जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर घाबरून न जाता सुरक्षित कोपऱ्यात डोके झाकून बसा. अशा काही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. Kanthak Suryatal Post Views: 556 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उस्माननगर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 20.16 लाखांचा मुद्देमाल जप्त गोदावरी पात्रातील अवैध वाळू उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा; ५ आरोपींवर गुन्हा, ४५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त