नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत उस्माननगर पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर प्रभावी कारवाई करत सुमारे 20 लाख 16 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत भारत बेंझ कंपनीचा हायवा टिप्पर ताब्यात घेण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिराढोण तांडा ते गोळे गाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान एमएच-16-सीसी-3865 क्रमांकाचा भारत बेंझ हायवा टिप्पर अडवून तपासण्यात आला. वाहनातून कोणताही वैध परवाना नसताना सुमारे 5 ब्रास रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत 16 हजार 610 रुपये किमतीची रेती व 20 लाख रुपये किमतीचा भारत बेंझ हायवा टिप्पर असा एकूण 20 लाख 16 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक गजानन संतोष कदम (वय 19, रा. सोमठाणा, ता. नायगाव, जि. नांदेड) याच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच खान व गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक तसेच उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी नागरिकांना अवैध रेती उत्खनन, साठवण अथवा वाहतूक आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन केले असून अशा अवैध कृत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 618 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध गुटखा-पानमसाला विक्रीवर वजिराबाद पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त भूकंपा बाबत जि. प. शाळेत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम