स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांची संयुक्त कारवाई नांदेड(प्रतिनिधी) :-वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकपुरा येथे झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या जलद कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकपुरा येथील शेख शामीम शेख इसाक याने सन 2023 मधील एका प्रकरणात तक्रार दिल्याच्या रागातून आरोपींनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. तसेच तलवार व चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 302/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) तसेच शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले व वजीराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान 62 ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. तसेच संबंधित संशयितांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेण्यात आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मिर्झा शब्बीर बेग गफार बेग (वय 39), ऋषिकेश अनिल धुळे (वय 23), सय्यद सुफियान सय्यद जमीर (वय 19), माधव भगवान कांबळे (वय 21) आणि मुस्ताक अहमद इसाक अहमद (वय 21) या पाच आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेजने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे , विठ्ठल घोगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि मिलींद सोनकांबळे ,पोउपनि महेश कोरे, पोउपनि, नागनाथ तुकडे, पोउपनि साईनाथ पुयड यांच्यास स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा केला अविनाश असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नायब मुतवल्लीची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि शस्त्राने वार करून निर्घृण हत्या प्रकरणी तीन नावासह पाच जणांवर गुन्हा दाखल Kanthak Suryatal Post Views: 2,231 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शॉर्टसर्किटमुळे श्री मेडिकल जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान, कुटुंब थोडक्यात बचावले इराण युद्धातून जग बहुध्रुवीय होण्याचा मार्ग बळकट – एड.संजय पांडे