आज जागतिक योग दिन; सहा दिवसीय शिबिराचा समारोप नांदेड – मानवाच्या दैनंदिन जीवनात योग अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण असे असून आजच्या धावपळीच्या आणि धक्काधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीनेही योगाचे महत्त्व वाढलेले आहे. शालेय जीवनापासूनच याची सुरुवात करताना सर्व शाळांनी परिपाठात योगासनांचा अंतर्भाव करावा असे आवाहन लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. ढवळे यांनी केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सहा दिवसघेण्यात आलेल्या योग शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. शाळेत राबविल्या जाणार्या शालेय तथा सहशालेय उपक्रमांबरोबरच दररोज एक योगासन हा पाच मिनिटांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम आदी प्राणायामाबरोबरच सोमवार-ताडासन, मंगळवार- वृक्षासन, बुधवार- पादहस्तासन, गुरुवार- भद्रासन, शुक्रवार- भुजंगासन, शनिवार- पवनमुक्तासन असे आठवड्याचे वेळापत्रक शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या मूल्य संस्कारांची आज आवश्यकता भासत आहे त्यात शालेय अभ्यासक्रमात योग-विज्ञान हा शास्त्रीय महत्त्व जपणारा पाठ्यक्रम समाविष्ट केला पाहिजे. यासाठी योग शिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. सहशिक्षक एस.एम. घटकार आणि विषय शिक्षक उमाकांत बेंबडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील उपक्रमात गावकर्यांचेही सहकार्य लाभले असून माजी सरपंच साहेब शिखरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, माजी अध्यक्ष किशन गच्चे, तुकाराम गोडबोले, रोहिदास गोडबोले, पुरभाजी गोडबोले, श्रीरंग गच्चे, पांडुरंग गच्चे, मनिषा गच्चे, मारोती चक्रधारी, हैदर शेख, कमलबाई गच्चे, हरिदास पांचाळ, रमा गोडबोले, आनंद गोडबोले आदींनी सहकार्य केले. Kanthak Suryatal Post Views: 722 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वीस वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; दाभड–मेंढला शिव रस्त्याच्या कामास प्रारंभ माहीती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष कार्यक्रमाचे आयेाजन