नांदेड – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड आणि योग विद्याधाम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, शारिरीक आरोग्य असो की मानसिक आरोग्य तसेच तनावपूर्ण जीवनात आनंद मिळवण्यासाठी निरंतर योग अभ्यास करणे, तसेच संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून देण्यासाठी 21 जून हा दिन जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आंतराष्ट्रीय योग दिन 2026 चे ब्रिदवाक्य “Yoga for Healthy Ageing.” हे असून या दिनाचे महत्व लक्षात घेऊन योग अभ्यास व विविध कार्यक्रमांनी हा साजरा करण्यात येणार आहे. शहरातील विमानतळरोडवरील शिव मंदिर येथील सभागृहात 21 जून रोजी सकाळी ठीक 6.00 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमात योग साधकांना आणि नागरिकांना योगाचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विशेष कार्यक्रमात योग विद्याधामचे प्रसिद्ध योगाध्यापक त्र्यंबक गायकवाड आणि सहशिक्षक प्रभाकर रेनगुंटवार उपस्थितांना योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आनंद कल्याणकर यांचे ‘आरोग्य आणि जीवनशैली’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विश्वनाथ रेनेवाड, श्रीमती शंकुतला कलंबरकर, श्रीमती मंगला जोंधळे श्रीमती कविता आष्टुरकर आदी योग अभ्यासकांची प्रमुख उपस्थीती असणार आहे.शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी परिसरातील नागरिक, तसेच युवकांनी या योग शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिध्दी प्रमुख सुमीत दोडल तर योग विदयाधामचे प्रमुख नागोराव पोलादवार यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 695 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दैनंदिन जीवनात योगाभ्यास महत्त्वाचा- जी.एस. ढवळे सोनेरी शिवसेना चोरांच्या किंवा गद्दारांच्या हाती देणार नाही!