नांदेड़ (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलिस ठाण्यातील घडामोडींनी सध्या एकाच्या डोक्यावर टाळी, दुसऱ्याच्या डोक्यावर माळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या एका छायाचित्राने जे वादळ उठवले, त्यात अखेर अर्धापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू कराळे तसेच पोलीस अमलदार संतोष काळे यांना 17 जून 2026 रोजी दुपारी १२.३९ वाजेच्या सुमारास अनुक्रमे नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालयात हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, 15 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात एका आरोपीसोबत वाढदिवस साजरा केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याचबरोबर आरोपींसोबत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांची छायाचित्रे वास्तव न्यूज लाइवला उपलब्ध झाल्यानंतर टी बातमी वास्तव न्यूज लाइवने प्रसिद्ध केलि होती. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला होता की, नियम फक्त काहींसाठीच आहेत का? कारण म्हण आहे, सासूला एक न्याय आणि सुनेला दुसरा न्याय, पण पोलिस खात्यातही हाच फॉर्म्युला लागू झाला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारवाई झाली, हे स्वागतार्ह. मात्र या कारवाईची गंगा नेमकी कुठून वाहू लागली आणि तिचे पाणी फक्त दोनच जणांच्या अंगणावर का पोहोचले, हा खरा प्रश्न आहे. आरोपींसोबत फोटो असलेल्यांची यादी जर मोठी असेल, तर मग गंगाजळाचे शिंतोडे फक्त कराळे आणि काळे यांच्यावरच का उडाले? उर्वरित मंडळींना म्हणजे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यानाअभयदान मिळाले का?आदेश कधी निघाला, कुणी कसुरी अहवाल पाठवला, चौकशीचे निष्कर्ष काय होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र कारवाईची घाई पाहता, आजार म्हशीला आणि इंजेक्शन पारख्याला अशी म्हण आठवल्याशिवाय राहत नाही. पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ राहावी यासाठी सर्वांवर समान मापदंड लागू होणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्यांचे मोठे आणि छोट्यांचे खोटे अशी भावना जनमानसात बळावते. जर आरोपींसोबतचे संबंध हा निकष असेल, तर तो सर्वांसाठी असायला हवा. अन्यथा ही कारवाई न्यायापेक्षा निवडक बळी शोधण्याचा प्रयत्न म्हणूनच पाहिली जाईल. आता सर्वांच्या नजरा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लागल्या आहेत. गंगा खरोखरच सर्वांसाठी वाहणार की तिचा प्रवाह निवडकच राहणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. संबंधित बातमी .. एकाच फोटोवर खटला, दुसऱ्यावर शांतता का?– पत्रकारांचे पोलीस निरीक्षकांकडे दुर्लक्ष आणि सहायक पोलीस निरीक्षकांवर लक्ष Kanthak Suryatal Post Views: 803 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उड्डाणपुलावर पार्किंगचा बाजार; वाहतूक शाखेचे डोळे झाकून बसल्याने नागरिक त्रस्त न्यायप्रवेशाच्या लढ्याला बळ; नांदेड अभिवक्ता संघाच्या पाठपुराव्याला पालक न्यायमूर्तींच्या सकारात्मक प्रतिसाद