पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर व नांदेड जिल्ह्यात धाडी नांदेड (प्रतिनिधी)- परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती. पथकाने , दिनांक 09 जून 2026 रोजी, लातूर जिल्हयातील रेणापुर येथे गांधी चौकातील मटका बुकीवर कारवाई करत, 28,440/- रुपयांची रोकड व 40 हजार रुपयांचे (04) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (7) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द रेणापुर पोलीस ठाणे येथे गुरनं 271/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाई सोबतच, विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीत नवीन रेणापुर नाका येथील योगेश बनसोडे यांचे शेडमध्ये, कल्याण मटका चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, 37,680/- रुपयांची रोकड व 72 हजार रुपयांचे (03) मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण (8) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द विवेकानंद पोलीस ठाणे येथे गुरनं 429/2026 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, विशेष पथकाने, लोहा पोलीस ठाणे हद्दीत, नांदेड – अहमदपूर रोडवर वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या (3) हायवांविरुद्ध, तर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत एका हायवा विरुद्ध कारवाई करत (8) आरोपींविरुद्ध लोहा व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 303 (2), 3(5) भा.न्या.सं. सह कलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये गुन्हे नोंदविले असून, त्यांच्याकडून 4 हायवा व 20 ब्रास वाळू असा एकूण 1,41,00,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चारही कारवायांमध्ये पोलीस पथकाने एकूण 1,42,78,120/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, (23) आरोपीतांविरुद्ध वरीलप्रमाणे (4) गुन्हे नोंद केले आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. खबर हेल्पलाइन वरून माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 606 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या तीन घटना; लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त स्मशानभूमीत रंगले कविसंमेलन