नांदेड – भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ₹5 च्या नोटा तसेच ₹20 ची नाणी ही पूर्णपणे कायदेशीर चलन (लीगल टेंडर) असून सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये त्यांचा स्वीकार करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी या नोटा व नाण्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, ₹5 च्या नोटा आणि ₹20 ची नाणी कोणत्याही शंका किंवा गैरसमजाशिवाय स्वीकारावीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सर्व चलनी नोटा आणि नाणी वैध असून त्यांचा स्वीकार करण्यास नकार देणे अयोग्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बँका, व्यापारी संघटना आणि संबंधित संस्थांनी याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता कायदेशीर चलनाचा स्वीकार करावा आणि व्यवहार सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे Kanthak Suryatal Post Views: 798 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खान सरांना मिळालेल्या अंतरिम दिलासामुळे त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांना सुटकेचा श्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त