नांदेड (प्रतिनिधी)- बळीरामपूर येथील ज्येष्ठ नागरिक, टेक्सकॉमचे व्हाईस चेअरमन तसेच बळीरामपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंग उर्फ आबा किशनराव गोडबोले (वय 80) यांचे रविवार, दि. 31 मे रोजी दुःखद निधन झाले. पांडुरंग उर्फ आबा गोडबोले हे गावातील आदरणीय व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, सहकार आणि ग्रामविकास क्षेत्रात त्यांनी सक्रिय योगदान देत गावाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या निधनामुळे बळीरामपूर गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. 1 जून रोजी दुपारी 12 वाजता बळीरामपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातू, नातवंडे असा परिवार आहे. ते बळीरामपूरचे माजी सरपंच अमोल गोडबोले यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने गोडबोले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बळीरामपूर गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजसेवक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 748 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ओडिसा येथील मौलाना अब्दुल रहमान अली खान यांच्यावरील खोट्या आरोपांचा पर्दाफाश पश्चिम बंगाल में गहराता हिंसा संकट:जंगल राज शुरू हो गया है