नांदेड- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. 27 मे ते 1 जून दरम्यान एकूण 8 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. दाखल झालेल्या अर्जांमध्ये : कृष्णा नागेश पाटील (अपक्ष) – 4 अर्ज प्रविण प्रतापराव चिखलीकर (नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी/अपक्ष) – 2 अर्ज अमरनाथ अनंतराव राजूरकर (भाजप) – 4 अर्ज ज्योतिबा जयरामजी खराटे (अपक्ष) – 3 अर्ज पवार माधवराव निवृत्तीराव (अपक्ष) – 1 अर्ज रामदास शिवराज पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – 1 अर्ज पंकज माणिकराव गायकवाड (अपक्ष) – 1 अर्ज प्रशांत विराज इंगोले (अपक्ष) – 1 अर्ज भाजपचे अमरनाथ राजूरकर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामदास पाटील यांनी पक्षाचा अधिकृत AA-BB फॉर्म सादर केला आहे. नामनिर्देशन अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 आहे. मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल, तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील 452 पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 832 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एव्हडे वाईट दिवस पत्रकारितेत आज आले आहेत;इतरांना दोन टक्याचे म्हणणार्यांनी स्वःचे टके तपासायला हवे रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान