17 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदोन्नती-बदली आदेश जारी नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन च्या गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) पदावरील पदोन्नती व बदलीसंदर्भातील आदेश जारी केले आहेत. नियमित निवडसूची 2025-26 अंतर्गत 17 पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देऊन विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पदोन्नती व बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे विजय शंकरराव निकोळे – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर शिवाजी पर्वतराव गवारे – सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर नामदेव तुकाराम वाघमारे – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई राजू दादा अडागळे – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर आप्पासाहेब नामासाहेब जाधकर – सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर सुनिल शंकर शिंदे – सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई संजय बाजीराव बेंडे – सहायक पोलीस आयुक्त, डायल-112, नवी मुंबई वैभव विजय धुमाळ – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई अर्जुन गोविंदराव बोत्रे – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर सुनिल महादेव यादव – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शेषराव आबाजी उदार – पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण रागिणी रामचंद्र वाघमारे – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई राजीव आसाराम तळेकर – अपर पोलीस अधीक्षक (एपी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड साहेबराव लक्ष्मणराव गुट्टे – पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, नांदेड लक्ष्मण अनंत कांबळे – सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर भास्कर दत्तात्रय कदम – सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड तानाजी भिवा दराडे – पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण सरकारच्या आदेशानुसार या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून त्या न्यायालयीन निर्णय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,050 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैद्य स्विमिंग पूल चालकाविरुद्ध बालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल २४ आरोपींवर मकोका लागू