नांदेड(प्रतिनिधी)-काही महिन्यात बदलीसाठी प्र्रसिध्द असलेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना पुन्हा एक नवीन बदली देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर चार आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्यावतीने सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशांमध्ये तुकाराम मुंढे यांना झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणातून काढून अन्न व औषधी प्रशासन मुंबई येथील आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. कान्हुराज बगाटे यांना व्यवस्थापकीय संचालक महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. श्रीधर डुबे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण ठाणे येथे नियुक्ती दिली आहे. याच पदावर तुकाराम मुंढे कार्यरत होते. आर.एस.चव्हाण यांना व्यवस्थापकीय संचालक हापकिन जीव औषध निर्माण महामंडळ मुंबई येथील अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. बाबासाहेब बेलदार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 869 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खत कमी वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहान म्हणजे मोठे षडयंत्र नार्वे की लेडी पत्रकारने मचाया हंगामा;उसको किलो से गालियां;पर उसके समर्थकों की भीड़ बड़ी