नांदेड ग्रामीण पोलिसांचा जलद तपास जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी हत्या; गुन्हा काही तासांत उघड नवीन नांदेड : गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या आपल्या भाऊजीचा धारदार शस्त्रांनी खून करणाऱ्या दोन जणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय साहेबराव शिंदे (वय ३५, रा. मित्रनगर, बळीरामपूर) याचा त्याच्याच नातेवाईकांनी कट रचून खून केला. आरोपी साहेबराव बाबू वाघमारे (वय २४) व विशाल अनिल जाधव हे (वय २५) दोघेही मृत शिंदे यांचे मेव्हणे असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दारू पार्टीतून वाद; जंगलात नेऊन हल्ला शनिवारी रात्री इतवारा परिसरात विजय शिंदे, साहेबराव वाघमारे व विशाल जाधव यांनी एकत्र बसून दारू पार्टी केली. त्यानंतर तिघांनी मटण जेवणाचा आस्वाद घेत परिसरात फिरत फिरत बळीरामपूरजवळील जंगलसदृश ओसाड भाग गाठला. याच ठिकाणी आधीच आखलेल्या कटानुसार आरोपींनी आपल्या भाऊजीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. धारदार शस्त्रांनी शरीरावर अनेक वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या विजय शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृताविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय शिंदे याच्याविरुद्ध यापूर्वी बलात्कारासह चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आल्याचेही समोर आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी आणि तेलंगणा राज्यात त्याच्यावर गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.दरम्यान, खून करणारे दोन्ही आरोपी बाबू वाघमारे व विशाल जाधव यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पहिल्यांदाच गुन्हेगारी जगतात त्यांची नावे समोर आली आहेत. काही तासांत गुन्ह्याचा उलगडा घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. घटनास्थळ पंचनामा, तांत्रिक तपास व माहितीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला.उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर पथकाने अवघ्या काही तासांत आरोपींना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. पोलिसांचे कामच पूर्ण केले चर्चेला उधाण मृत व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने परिसरात या घटनेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी आरोपींनी पोलिसांचे कामच पूर्ण केले अशी कुजबुज सुरू असली तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.सध्या आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करीत आहेत. संबंधित बातमी …. नांदेड शहरात २४ तासातच दुसरा खून Kanthak Suryatal Post Views: 2,277 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; ₹4.65 लाखांचा महसूल वसूल हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल लंपास, पोलिसांचा कागदोपत्री चमत्कार पुन्हा चर्चेत