परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापच्या पथकाने परभणी शहरात धडक कारवाई करत मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण 10 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात रोकड व साहित्य जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 एप्रिल रोजी नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता मार्केट व जुना मोंढा परिसरात शटरआड सुरू असलेल्या मटका व्यवसायावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 24 हजार 990 रुपयांची रोकड व सुमारे 25 हजार रुपयांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्मशानभूमी रोडवरील एम. आर. हॉटेल येथेही मटका बुकीवर कारवाई करण्यात आली. येथे 7 हजार 920 रुपयांची रोकड व 11 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 32 हजार 910 रुपयांची रोकड व मोबाईलसह 68 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,संजीव जिंकलवाड,गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा सहभाग होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांविरुद्ध माहिती देण्यासाठी खबर हेल्पलाईन (91 50 100 100) सुरू करण्यात आली असून नागरिकांनी याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 769 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायतसमोर सरण; २५ तासांपासून पार्थिव ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून पोलीस निरिक्षक भोसले यांना देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा