नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 16 पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्यानंतर ते नांदेड पोलीस परिक्षेत्रात हजर झाले. त्यानंतर त्या सर्वांना परिक्षेत्रातून नांदेड जिल्हा पोलीस दलात पाठविण्यात आले. पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रभारी कार्यालय अधिक्षक सी.पी.कपाळे यांच्या स्वाक्षरीने या 16 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातील 16 पोलीस अंमलदार दि.16 एप्रिल 2026 रोजी पोलीस उपनिरिक्षक ही पदोन्नती घेवून पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्र येथे हजर झाले. दि.17 एप्रिल रोजी त्यांना नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात हजर करून घेण्यात आले. त्यांना देण्यात आलेल्या नियुक्त्या पुढील प्रमाणे आहेत. पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय अत्रिनंद गिरी-कुंडलवाडी, नारायणसिंह भवमसिंह रघुवंशी-उमरी, उत्तम रामराव सकनुरे-देगलूर, अनिल गंगाधर मानेकर-इतवारा, विश्वनाथ शंकरराव वसमते-विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्ष, व्यंकट परशुराम शिंदे-बारड, मोहम्मद गौस गुलाम जिलानी-स्ट्रिट स्पेटी पथक, संतोष गंगाधर तिडके-शहर वाहतुक शाखा वजिराबाद, साहेबराव आलु आडे-इतवारा, विठ्ठल श्रीमंतराव खोमणे-जिल्हा विशेष शाखा, विश्र्वंभर दिगंबरराव निकम-कुंटूर, बालासाहेब सदाशिव पांपटवार-सोनखेड, शेख रसुल महेबुब साब-तामसा, विठ्ठल माधवराव गवळी-इतवारा, हनुमंत निवृत्ती तुपकर-नियंत्रण कक्ष नांदेड, महम्मद जाकेर शेख कासीम-वाचक इतवारा उपविभाग. Kanthak Suryatal Post Views: 1,130 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आरक्षण उपवर्गीकरणावर संतप्त प्रतिक्रिया; प्रक्रिया तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अरिजितसिंगच्या खूनातील कबुत्तरसह एक जण पोलीस कोठडीत